Kiran Mane On TDM Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane On TDM Film: “या वेळी खऱ्या अर्थाने मराठी ‘दीन’ झाली…,” किरण माने मराठी सिनेसृष्टीबद्दल जरा थेटच बोलला

‘टीडीएम’ चित्रपटातील कलाकार थिएटरमध्ये रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नुकताच या मुद्द्यावर किरण मानेने एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Kiran Mane On TDM Film: सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चलती आहे. पण काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल असूनही, त्यांना थिएटर मालकाकडून प्राईमटाईम मिळत नाही. अनेकदा अशी देखील चर्चा झाली आहे, मराठी चित्रपटांना पाहण्यासाठी खास प्रेक्षकवर्ग नाही. आता प्रेक्षकवर्ग जरी उपलब्ध असला तरी, थिएटर मालकांकडून चित्रपटाला उबलब्ध केली जात नाही.

२८ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर ‘टीडीएम’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. हे दोन्ही ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल सुरू असून थिएटर मालकांकडून ‘टीडीएम’चित्रपटासाठी हवे तसे शो उपलब्ध करून देत नसल्याने दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीम याविषयी बोलताना या चित्रपटातील अभिनेत्याला अश्रूही अनावर झाले. तो थिएटरमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून या मुद्द्यावर किरण मानेने एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून तो ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे बराच प्रकाशझोतात आला होता. सोबतच त्या आधी किरण माने मालिका आणि नाटकामधून देखील अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नेहमीच सामाजिक विषयाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करणारे किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आले. सध्या काही मराठी चित्रपटांना शो मिळत नाहीत, मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, या विषयावर नुकतेच किरण मानेनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.

किरण मानेने त्याच्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, “अस्सल मराठी मातीतल्या ‘TDM’ला शोज मिळत नाहीत. मराठी मातीचा दरवळ देशभर पसरवणाऱ्या शाहीरांना सलाम करण्यासाठी आलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ला शोज आहेत पण प्रेक्षक नाहीत. या वेळी खऱ्या अर्थाने मराठी ‘दीन’ झाली आहे.” दरम्यान, अनेकदा मराठी चित्रपटांना थिएटर किंवा प्राईम- टाईम मिळत नसल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक नाराज होतात. सध्या शाळांना सुट्ट्या पडल्या असून बॉक्स ऑफिसवर अनेक मराठी-हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामुळे सर्व चित्रपट निर्मात्यांनी एकत्र बसत यावर चर्चा करायला हवी. (Marathi Film)

Kiran Mane On TDM Film Social Media Post

नुकतेच अजित पवार यांनी यांनी ट्विट करत TDM चित्रपटाला स्क्रिन उपलब्ध करून देण्याचे आवाहन केलं आहे. ट्वीटमध्ये अजित पवार म्हणतात, “राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.” अजित पवार यांनी केलेल्या या ट्विटनंतर आणि अनेक सेलिब्रिटींकडून चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता संबंधित थिएटर मालक याची दखल घेणार का? आणि TDM सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवे तितके स्क्रिन उपलब्ध होणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT