Kiran Mane Share Post On World Theatre Day: आज जागतिक रंगभूमी दिन आहे. कलाकारांसाठी हा दिवस खूप खास असतो. मालिका, चित्रपट किंवा वेबसीरीज जरी केल्या तरी कलाकारांचे रंगभूमीवरचे प्रेम कधी कमी होत नाही. मालिका-चित्रपट यातून पैसे,प्रसिद्धी मिळते. परंतु सच्चा कलाकाराला हवी असते ती दाद आणि ती मिळते रंगभूमीवर. रंगभूमीवर प्रेम करणारे अनेक कलाकार आहेत. त्यातील एक म्हणजे किरण माने.
किरण माने नेहमी सांगतात, 'मी सच्चा कलाकार आहे, मी हाडाचा नट आहे.' या हाडाच्या कलाकाराने आजच्या दिवशी एक पोस्ट केली आहे. तसेच या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीने त्यांना काय दिले हे सांगितले आहे.
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते... नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !" काल एका पत्रकार मित्राचा फोन आला, "उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?" 'रंगभूमीनं काय दिलं?' - रंगभूमीनं काय दिलं नाही?
रंगभूमीनं ओळख दिली... आत्मविश्वास दिला... भवतालचं, समाजाचं भान दिलं... भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला... उच्च अभिरूचीचं वरदान दिलं...सांस्कृतीक श्रीमंती दिली... रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं ! अजून काय पाहिजे? सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! - किरण माने.
ही पोस्ट शेअर करत किरण माने यांनी काही फोटो शेअर केला आहेत. हे सर्व फोटो त्यांनी केलेल्या नाटकातील आहेत. पहिल्या फोटोमध्ये किरण माने, लीना भागवत, मंगेश कदम आणि ओंकार राऊत दिसत आहेत.
दुसऱ्या फोटोमध्ये अमृत सुभाष आहे. तिसऱ्या फोटोमध्ये मकरंद अनासपुरे दिसत आहेत, चौथ्या फोटोमध्ये अशोक सराफ, पाचव्या फोटोमध्ये स्मिता तळवलकर आणि अनिता दाते, सहाव्या फोटोमध्ये प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.