Kiran Mane In Politics Instagram/ @kiranmaneofficial
मनोरंजन बातम्या

Kiran Mane In Politics: अभिनेते किरण मानेंची राजकारणात एन्ट्री; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधणार शिवबंधन

Marathi Celebrity In Politics: बिग बॉस फेम अभिनेते किरण माने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Chetan Bodke

Kiran Mane In Politics

सेलिब्रिटी मंडळींचं आणि राजकारणाचं एक घनिष्ठ नातं आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत त्यांनी राजकारणात एन्ट्री घेत स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. मराठी सेलिब्रिटींसह अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री राजकारणात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अनेक सेलिब्रिटींनी राजकारणामध्ये एन्ट्री केली. अशातच आता आणखी एक मराठमोळा अभिनेता राजकारणामध्ये येतोय. बिग बॉस फेम अभिनेते किरण माने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. (Marathi Actors)

किरण माने कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि सिनेसृष्टीतील मुद्द्यांवर ते भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतात. कायमच सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे चर्चेत राहणारे किरण माने राजकारणात प्रवेश करणार असल्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. अभिनेते किरण माने आज हाती शिवबंधन बांधणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात ते आज प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी बीडसह, मराठवाड्यातील काही कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार आहेत. किरण माने यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे एका मालिकेतूनही त्यांना काढून टाकण्यात आलं होतं.

आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि नेत्या सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी ही अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला आहे.

खासदार अमोल कोल्हे, गायक आनंद शिंदे, अभिनेत्री प्रिया बेर्डे, मेघा धाडे, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, प्रभाकर मोरे, गार्गी फुलेसह अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT