Bigg Boss Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात अपूर्वा आणि विकासची खास मैत्री; अपूर्वा म्हणते, 'पण ही संधी मी तुला देणार नाही.'

बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्यात अपूर्वा- अमृतानंतर आता अपूर्वा आणि विकासमध्येही खटके उडताना दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नुकत्याच झालेल्या एलिमिनेशन राऊंडनंतर आता पुन्हा एकदा घरात स्पर्धकांमध्ये नोकझोक होताना दिसत आहे. काहीतरी कारणावरुन प्रत्येकांमध्ये हमरी- तुमरी होताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi) बिग बॉसच्या घरात या आठवड्यात 'फटा पोस्टर निकला झिरो' या नॉमिनेशन कार्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी आणि रविवारी झालेल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्वांच्याच खेळावरुन कान उघडणी केली आहे. बिग बॉसच्या घरातील पहिल्या स्पर्धकाला कायमचे बाहेर पडावे लागले आहे. डॉ. निखिल राजेशिर्केला नॉमिनिज करत घरातून बाहेर पडावे लागले. (Marathi Entertainment News) (Marathi Actors) (Marathi Actress)

कालपासून बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील नॉमिनेशन कार्याला सुरुवात झाली आहे. कालच्या दिवसात घरातील प्रत्येक स्पर्धकामध्ये नॉमिनेशन कार्याबद्दल बोलताना दिसत होते. जर मदत नाही केली तर समोरच्या स्पर्धकाला नॉमिनेट करण्याचाही सज्जड दम एकमेकांना दिला. बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्यात अमृता आणि अपूर्वाने एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप केले होते. अमृताने नॉमिनेशन कार्यात दिलेल्या अनेक कारणांमुळे अपूर्वाचा चांगलाच पारा चढला होता. तसेच अपूर्वा आणि अमृतानंतर आता अपूर्वा आणि विकासमध्येही खटके उडताना आजच्या भागात दिसणार आहे.

काल देखील अपूर्वाने विकासला बजावून सांगितले की, 'जर मला तुझ्याविषयी काही चुगली आली तर मी आहे आणि तू आहे. माझ्यासारखी वाईट कोणी नसेल.' पुन्हा एकदा आज या दोघांमध्ये मजेशीर गप्पा रंगताना दिसणार आहेत. अपूर्वाने विकासला सांगितले, “पुढच्या वेळेस मी जीपण ड्युटी घेईन ती नाही घेतलीस तर मी तुझे आभार मानेन.” विकासचे त्यावर मत आहे, जेवण मग ...?

त्यावर अपूर्वाने बजावले, "विचार पण नाही करायचा. मी खरंच सांगते माझ्याबरोबर किचन नाही. मी अशी सुगरण नाहीये... मी आधीच सांगते आहे. विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील. या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकत, तरी तू मला उचलशील... ज्याअर्थी तू माझी बॅग उचलीस तशी...” विकास म्हणाला, “मला पण वाटत आहे...” त्यावर अपूर्वाने विकासला खास शैलीत उत्तर देत म्हणते "पण ही संधी मी तुला देणार नाही." हे ऐकताच सगळयांना घरात हसू फुटले.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT