Bigg Boss Marathi Prasad Jawade
Bigg Boss Marathi Prasad Jawade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: प्रसाद जवादे घराबाहेर, 'या' स्पर्धकांमध्ये रंगणार ग्रँड फिनालेची चुरस...

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा येत्या रविवारी ग्रँड फिनाले पार. पडणार आहे. त्यामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांचे लक्ष कोण ट्रॉफी जिंकनार याकडे लक्ष लागले आहे. एका ट्रॉफीसाठी स्पर्धक कोणत्या थराला जातील याचा पुरावा अनेकदा आपल्याला आलेला आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण ट्रॉफीसाठी बरेच भांडत आहेत. त्यामुळे जसजशे दिवस कमी होत आहेत, तसतशे प्रत्येकाची उत्कंठा वाढत चालली आहे.

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण सात स्पर्धक होते. त्यात किरण माने, आरोह वेलणकर, अक्षय केळकर, प्रसाद जवादे, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे स्पर्धक होते. यांच्यात या आठवड्यात एकूण ३ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामध्ये राखी सावंत, अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे होते. त्यातून एक शेवटचा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. तो म्हणजे प्रसाद जवादे.

प्रसादच्या खेळण्याच्या पद्धतीनुसार आणि वागणुकीमुळे त्याला बऱ्याच जणांनी लक्ष केले होते. प्रत्येक नॉमिनेशन कार्यात त्याचे नाव आवर्जून प्रेक्षक घ्यायचे. तो एलिमिनेट झाल्याने सर्वच स्पर्धकांना दुःख झालं. आपल्याला अगदी शेवटच्या क्षणी घराबाहेर पडावं लागतंय हे ऐकूनच प्रसादचेही डोळे पाणावले. सगळ्या स्पर्धकांनी भावूक होत त्याला निरोप दिला. तर घराबाहेर जाताना प्रसादने सर्व स्पर्धकांची माफी मागून “आपली जी भांडणं आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया” असं म्हणाला.

येत्या रविवारी म्हणजे, 8 जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या आठवड्याच्या मधल्या भागात आणखी एक स्पर्धक घराच्या बाहेर जाणार आहे. एकूण पाच स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये राहणार आहेत. त्यामुळे आत्ता आणखी एक स्पर्धक कोण घराबाहेर जाणार आणि कोणा- कोणाला ग्रँड फिनालेचे तिकीट मिळणार आणि कोण ट्रॉफी जिंकनार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या तरी तिकीट टू फिनाले अपूर्वाला मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

Rakhi Sawant Successful Surgery : राखी सावंतवर कशी झाली सर्जरी ?, Ex Husband ने दिली हेल्थ अपडेट; खिल्ली उडवणाऱ्यांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT