Shiv Thakare Wedding  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare Wedding : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

Bigg Boss Marathi 2 winner Shiv Thakare Got Married : 'बिग बॉस मराठी सीझन २' चा विजेता शिव ठाकरे लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी 2'चा विजेता शिव ठाकरे लग्नबंधनात अडकला आहे.

शिवने बायकोसोबतचा लग्नातील रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

शिवच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

'बिग बॉस मराठी 2'चा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare Wedding ) लग्नबंधनात अडकला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. शिव ठाकरेने बायकोसोबतचा लग्नातील रोमँटिक फोटो शेअर केला आहे. शिव ठाकरेने अचानक असा फोटो टाकून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. शिव ठाकरेला 'बिग बॉस मराठी'मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे.

शिव ठाकरेने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो नवरदेवाच्या रुपात दिसत आहे. गुलाबी रंगाचे धोतर त्याने परिधान केले आहे. तसेच कपाळावर मुंडावळ्या बांधल्या आहेत. फोटोमध्ये शिवने बायकोचा चेहरा दाखवला नाही. शिवच्या हाताला पकडून त्याची बायको पाठमोरी उभी आहे. तिने सुंदर मेहंदी कलरची साडी नेसली आहे. तर जांभळ्या रंगाचा शालू घेतला आहे. दोघे एकत्र खूप छान दिसत आहे. तिच्या कपाळावर मुंडावळ्या बांधल्या आहेत. शिव खूपच आनंदी आहे.

शिव ठाकरे पोस्टला खूप हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "Finally..." शिव ठाकरे नुकताच लग्न बंधनात अडकला असून त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर एकीकडे चाहते आणि कलाकार कमेंट्सचा, शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे नेटकरी असेही म्हणत आहे की, हा एखाद्या शूटिंगचा फोटो आहे. शिवचा नवीन प्रोजेक्ट येत आहे.

शिवच्या या पोस्टवर कॉमेडी क्वीन भारती सिंहने कमेंट केली आहे. तिने लिहिलं की, "ये कब हुआ भाई...अभिनंदन" शिवने फोटोमध्ये बायकोचा चेहरा दाखवला नाही. त्यामुळे चाहते आता शिवच्या नवरीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अलिकडेच शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी' च्या रियुनियन पार्टीत दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT