भारतीय टेलिव्हिजनसृष्टीमध्ये ‘बिग बॉस’ची कायमच चर्चा असते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या ‘बिग बॉस’ची तुफान चर्चा होते. सध्या हिंदीसोबत कन्नड आणि तेलुगू भाषेतील ‘बिग बॉस’ टेलिकास्ट केले होत आहे. अशातच ‘बिग बॉस कन्नड’ मधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘बिग बॉस कन्नड १०’चा स्पर्धक वर्थुर संतोष याला एका लॉकेटमुळे अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला २२ ऑक्टोबर रोजी शो सुरु असताना त्याला अटक केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कायमच वादाच्या भोवऱ्यात असणारा ‘बिग बॉस कन्नड’ शो यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस कन्नड १०’ मधील लोकप्रिय स्पर्धक वर्थुर संतोषने गळ्यामध्ये एक लॉकेट घातल्यामुळे त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याने ‘बिग बॉस कन्नड’च्या घरामध्ये वाघाच्या पंजापासून बनवलेलं एक लॉकेट घातलं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करत कायदेशीर कारवाई केली आहे. रविवारी अर्थात २२ ऑक्टोबर रोजी त्याला ‘बिग बॉस’च्या घरातून अटक केली आहे.
‘बिग बॉस कन्नड’च्या सेटवरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्मात्यांकडे शोमधून वर्थुर संतोषची चैन आणि लॉकेट आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून लॉकेटची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये वाघाचे पंजे खरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी अटक केली असून सध्या त्याची आणि लॉकेटची कसून चौकशी होत आहे. अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
स्पर्धकाने कॅमेऱ्यासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देताच त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. वर्थुर संतोषकडून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२चे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणी वर्थुर संतोषवर काय कारवाई होणार? पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.