Bigg Boss Saam Tv Youtube
मनोरंजन बातम्या

Bigg Bossचं घर शापित? बिग बॉस स्पर्धकांचा अकाली मृत्यू? 9 स्पर्धकांच्या मृत्यूनं खळबळ

Shefali Jariwala : शेफालीच्या जरीवालाच्या मृत्यूनं बिगबॉसच्या घरावर आता सवाल उपस्थित होतायेत. एका अभिनेत्रीनं केलेल्या दाव्यानं तुमचा आवडता शो असणारा बिगबॉसमधील स्वप्नवत घर हे शापित घर आहे का असा प्रश्न उपस्थित होईल. होय शेफालीच्या मृत्यूनंतर या अभिनेत्रीनं काय म्हटलंय पहा..

Snehil Shivaji

शेफाली जरीवाला (मृत्यू - 27 जून 2025, बिग बॉस - 13)

सिद्धार्थ शुक्ला (मृत्यू - 2 सप्टेंबर 2021, बिगबॉस सीजन 13

प्रत्युषा बनर्जी (मृत्यू -1 एप्रिल 2016, बिग बॉस सीजन 7

स्वामी ओम (मृत्यू - 3 फेब्रुवारी 2021, बिग बॉस सीजन 10)

सोनाली फोगाट (मृत्यू - 23 ऑगस्ट 2022, बिग बॉस सीजन 14)

सोमदास चट्टन्नूर (मृत्यू - 31 जानेवारी 2021, बिग बॉस, मल्याळम सीजन 2)

जयश्री रमैया (मृत्यू - 25 जानेवारी 2021, बिग बॉस, कन्नड सीजन 3)

राजू श्रीवास्तव (मृत्यू - 21 सप्टेंबर 2022, बिग बॉस सीजन 3)

जेड गुडी (मृत्यू - 22 मार्च 2009, बिग बॉस सीजन 2)

जया सावंत (मृत्यू - 28 जानेवारी 2022, बिग बॉस सीजन 14 आणि 15)

हे सर्वजण आज हयात नाहीत. या सर्वांचा मृत्यू विविध कारणांनी झालेला असला तरी याचं एक कनेक्शन ते म्हणजे बिग बॉस. होय बिग बॉसचं घर हे एक खास तयार केलेलं, तंत्रज्ञानाने सुसज्ज बंदिस्त घर आहे. ओपन हॉल, रंगीबेरंगी फर्निचर, भिंतींवर विचित्र वॉल आर्ट, स्विमिंग पूल, जिम, गार्डन, एकच रूम अनेक बेड असं हे प्रशस्त कुणालाही बघताच क्षणी प्रेमात पाडणारं राजेशाही घरं आज शेफाली जरीवाला मुळे वादात सापडलंय. हे घरं शापित घरं असल्याचं म्हटलंय अभिनेत्री हिमांशी खुरानानं..

"बिग बॉसचं घर हे शापित आहे असं मला वाटतं"

अभिनेत्री हिमांशी खुरानानं शेफाली सोबत फोटो टाकून ज्या घरात जाण्यासाठी सेलिब्रेटी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात त्याच घराला शापित म्हणत खळबळ माजवलीये. सेलिब्रिटींच्या बंद दाराआड काय घडतं हे बिगबॉसच्या घरातील 100 कॅमेऱ्यांमध्ये टिपून प्रेक्षकांना दाखवलं जातं. मात्र 2006 पासून सुरु झालेल्या या रियालिटी शोमधील ९ स्पर्धकांचा अकाली मृत्यू झालाय. 4 जणांचा मृत्यू हदय विकारानं, दोघांचा मृत्यू कॅन्सरनं , दोघांनी आत्महत्या करुन जीवन संपवलय. तर स्वामी ओम यांचा मृत्यू हा कोरोनापाश्चात गुंतागुतीनं झालाय. मात्र अभिनेत्री हिमांशी खुरानाच्या या विधानामुळं बीग बॉसच्या घरात जाणाऱ्यांची आणि हा शो पाहणाऱ्यांचीही धाकधूक वाढली इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT