Salman Khan Instagram/@beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खान बिग बॉससाठी घेतो इतके मानधन, आकडा बघून आकडी येईल...

सलमान यावर्षी बिग बॉस होस्ट करण्यासाठी सुमारे 1000 कोटी रुपये घेत आहे. सलमान खाननेच बिग बॉसच्या या पत्रकार परिषदेत ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले.

Chetan Bodke

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान अनेक वर्षांपासून बिग बॉसचे होस्टिंग करत आहे. सध्या बिग बॉसचा १६वा सीझन सुरु आहे. हा शो १ ऑक्टोबरपासून कलर्सवर प्रसारित होत आहे. दरवर्षीप्रमाणेच या वेळीही प्रेक्षकांना बिग बॉसचा होस्ट सलमान खानची फी ऐकण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

सलमानबद्दल पूर्वी एक अफवा पसरली होती की, सलमान यावर्षी बिग बॉस होस्ट करण्यासाठी सुमारे 1000 कोटी रुपये घेत आहे. सलमान खाननेच बिग बॉसच्या या पत्रकार परिषदेत ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले.

सलमान यावेळी म्हणतो की, 'मला 1000 कोटी मिळाले तर मी आयुष्यात कधीही काम करणार नाही. त्याला त्यातून एक चतुर्थांशही पैसै मिळत नाहीत. सलमान पुढे म्हणतो की, माझा खर्च इतका आहे की तो मला फारच कमी वाटतो.'

समीक्षक आणि ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाच्या सदस्याने यासंबंधित सांगितले की, बिग बॉस 16 साठी सलमान खानला 800 कोटी रुपये मिळतात. सलमान खानने बिग बॉससाठी 1050 कोटी रुपयांची मागणी केली होती, परंतू त्याला ८०० कोटी रुपये देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT