Breaking - बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन  
मनोरंजन बातम्या

बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

कूपर हॉस्पिटलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्य झाला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज दुपारी १२.३० वाजता शवविच्छेदन अहवाल येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार. छोट्या परद्यावरचा मोठा अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. कूपर हॉस्पिटलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थ हा मुळचा मुंबईचा होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. त्याला नेहमीच बिझनेस करायची इच्छा होती. मात्र, २००४ मध्ये आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला आणि इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली.

सिद्धार्थ शुक्ला प्रामुख्याने छोट्या पडद्यावर आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये केलेल्या कामासाठी ओळखला जातो. त्यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमधून केले. त्यांनी रचना संसद स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईन, मुंबई येथून इंटिरियर डिझायनिंगमध्ये पदवी पूर्ण केली. अल्पावधीतच तिचे आकर्षक रूप, हॉट बॉडी आणि उत्कृष्ट अभिनय क्षमतेमुळे ती बहुतांश लोकांसाठी प्रसिद्ध चेहरा बनली आहे.

सिद्धार्थ मुंबईतील एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने २००८ मध्ये 'बाबुल का आंगन ना' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. लव्ह यू जिंदगी, बालिका वधू आणि दिल से दिल तक या मालिकेमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी आणि बिग बॉस 13 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत.

बिग बॉस 13 या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती. या शोमध्ये त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते. नुकतंच, सिद्धार्थ आणि शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT