Shehnaaz- MC Square New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shehnaaz- MC Square: शहनाज आणि एमसी स्टॅंडच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित, शहनाजची गाण्यात हॉट अंदाजात एन्ट्री

शहनाज लवकरच रॅपर आणि सोशल मीडिया सेन्सेशन एमसी स्क्वेअरसोबत एका नव्या गाण्यात दिसणार आहे. नुकताच त्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Shehnaaz- MC Square: शहनाज गिल सध्या तिच्या 'देसी वाइव्हज विथ शहनाज' (Desi Wibes With Shehnaaj) या नवीन टॉक शोमुळे चर्चेत आहे. आयुष्मान खुरानाने नुकताच शहनाजच्या या शोमध्ये हजेरी लावली होती. दुसरीकडे, अभिनेत्री सलमान खानसोबत तिचा आगामी चित्रपटात व्यग्र असून नुकतेच तिचे नवे गाणे प्रेक्षकांच्याही भेटीला येत आहे. शहनाज लवकरच रॅपर आणि सोशल मीडिया सेन्सेशन एमसी स्क्वेअरच्या आगामी 'गनी स्यानी' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.

बिग बॉस फेम शहनाज गिल आणि रॅप शो 'हसल २'चा विजेता एमसी स्क्वेअर यांच्या आगामी गाण्याचा पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता पण आता त्याच्या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये दोघांची जबरदस्त स्टाइल आणि गाण्याचा मिलाप चाहत्यांना अनुभवता येणार आहे. टीझर येताच सोशल मीडियावर शहनाज आणि एमसी स्क्वेअर ट्रेंड करत आहेत.

टीझर शेअर करताना शहनाजने लिहिले- 'गनी सयानीचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता. शहनाझ आणि एमसी स्क्वेअरसह जबरदस्त धमाक्यासाठी सज्ज व्हा.' दुसरीकडे, एमसी स्क्वेअरनेही या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे आणि गाण्यातील त्याचे काही लूकही शेअर केले आहेत.

दोघांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली होती. तो येताच चाहते चांगलेच आनंदीत होते. एमसी स्क्वेअरने त्यांच्या स्टुडिओमधील शहनाज गिलसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'काहीतरी मनोरंजक येत आहे.' यानंतर शहनाजनेही ही पोस्ट शेअर केली आणि ती एमसी स्क्वेअरसोबत मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT