sambhavna seth Saam Tv
मनोरंजन बातम्या

बिग बॉस फेम संभावना सेठ अचानक रुग्णालयात दाखल; पतीने केला आजाराचा खुलासा

अविनाश द्विवेदीने युट्युब ब्लॉगद्वारे अभिनेत्रीच्या आरोग्याचे अपडेट्स शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस (Big Boss) फेम संभावना सेठची (Sambhavna Seth) अचानक तब्येत खराब झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उलट्या आणि सर्दी-खोकल्याच्या तक्रारीनंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करावे लागले. पती अविनाश द्विवेदीने तिची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिली आणि रात्री उशिरा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अविनाश द्विवेदीने युट्युब ब्लॉगद्वारे अभिनेत्रीच्या आरोग्याचे अपडेट्स शेअर केले आहेत. त्याने सांगितले की, संभावनाला व्हायरल ताप आहे. संभावनाला आधीच डोकेदुखी आणि तापाचा त्रास होता. मात्र नंतर खोकल्यामुळे तिला उलट्या होऊ लागल्या आणि रात्री उशिरा तिला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी, संभावनाच्या घशात आणि शरीरात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. त्याच्यावर कोणतेही औषध काम करत नसल्याचेही सांगण्यात आले.

हे देखील पाहा -

'बिग बॉस सीझन 2' चा भाग असलेल्या संभावना सेठने अलीकडेच एका यूट्यूब ब्लॉगद्वारे स्वतःला संधिवाताचा त्रास असल्याचे सांगितले होते. अभिनेत्रीने स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन या आजाराचा खुलासा केला. आपली व्यथा मांडताना अभिनेत्री कॅमेऱ्यावर रडली.

संभावना म्हणाली की तिचे आजार अजिबात संपण्याचे नाव घेत नाही आहे. काही दिवसापूर्वी संभावनाने एका व्हिडिओमध्ये, IVF प्रक्रियेपासून ते संधिवातापर्यंत सर्व गोष्टींवर ती उघडपणे बोलली. या आजारामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या हात-अभिनेत्री अनेक वेळा IVF प्रक्रियेतूनही गेली आहे. पण तरीही ती आई होऊ शकली नाही.

संभावनाने 14 जुलै 2016 रोजी अभिनेता-लेखक अविनाश द्विवेदीसोबत लग्न केले. टीव्ही शो शिवाय तिने अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ही अभिनेत्री तिच्या आजारपणामुळे आणि वाढलेल्या वजनामुळे छोट्या पडद्यापासून दूर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT