Amruta's Father Shared On Daughter Special Poem Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prasad- Amruta Mehendi Function: अमृताच्या वडीलांनी सादर केली लेकीसाठी हृदयस्पर्शी कविता; लेकीसह बाबांचेही डोळे पाणावले... व्हिडीओ बघा

Amruta's Father Daughter Special Poem: अमृता देशमुखच्या वडीलांनी खास लेकीसाठी एक कविता सादर केली. कविता सादर करताना तिच्या वडीलांसोबतच अमृता सुद्धा भावूक झाली.

Chetan Bodke

Amruta's Father Shared On Daughter Special Poem

बिग बॉस मराठी फेम प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या केळवणाची प्रचंड चर्चा होते. आज अर्थात १८ नोव्हेंबर रोजी ही जोडी पुण्यात लग्नगाठ बांधणार आहेत. काल प्रसाद- अमृताचा मेहेंदी सोहळा पार पडला, यावेळी अमृता देशमुखच्या वडीलांनी खास लेकीसाठी एक कविता सादर केली. ही कविता सादर करताना तिच्या वडीलांसोबतच अमृता सुद्धा भावूक झालेली दिसली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘राजश्री मराठी’ या एन्टरटेन्मेंट युट्यूब चॅनलने प्रसाद- अमृताच्या मेहेंदीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर अमृताच्या वडीलांनी खास लेकीसाठी सादर केलेली कविता जोरदार व्हायरल होत आहे.

अमृता देशमुखच्या वडीलांनी सादर केलेली कविता

नाचण्यात दंग होते असे, की हरवल्या होत्या त्यांच्या दिशाही

गुंतले होते जीव असे की, त्यांना डोळ्यातच दिसत होते सर्व काही

प्रितीचा बहर फुलला असा काही, त्या गंधाची चढली होती नशाही

आपण दोघंच केवळ दोघंच, बाकी दुसरं कोणीही नाही...

हे भल्या माणसा मी सांगतो गुपित तुला

मी तिला आणि तिने मला पहिला वहिला श्वास दिला

सांगेल तुला ती अर्थ जगाचा आधी तिने माझ्यातच पाहिला

मी कसा विसरु सांग तिला... अशी त्यांनी कविता सादर केली.

सध्या सोशल मीडियावर अमृताच्या बाबांनी सादर केलेल्या कवितेची चांगलीच चर्चा होत आहे. ही कविता त्यांनी स्वत: लिहिलेली असून कवितेवर प्रेक्षकांकडून चांगलेच कौतुक होत आहे. ही कविता सादर करताना अमृताचेही आणि तिच्या बाबांचेही डोळे पाणावले आहेत. (Social Media)

मेहेंदीच्या कार्यक्रमामध्ये प्रसादने काळया रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. त्यावर काळया रंगाचा कोट परिधान केला होता. तर अमृताने ऑफ व्हाईट रंगाचा घागरा परिधान केला होता. त्यावर त्याला साजेसा मेकअप सुद्धा तिने केला होता. तिच्या ड्रेसवर सुंदर आणि बारीक नक्षीकाम सुद्धा केलेला दिसत आहे. (Marathi Film)

रश्मी अनपट, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ खिरीड, ओमकार राऊत, नम्रता संभेरावसह अनेक कलाकरांनी अमृता- प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली आहे. यावेळी अमृता- प्रसादच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर प्रसाद- अमृताच्या मैत्रीची चर्चा झाली होती. दोघांनीही जुलै महिन्यामध्ये आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने पार पाडला होता. त्यासोबतच अनेकदा प्रसाद- अमृताच्या केळवणाची सुद्धा चांगलीच चर्चा रंगली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT