Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : बिग बॉसच्या गेमवर निक्कीनं मांडल मत; 'सूरज सहानुभूतीच्या जोरावर ट्रॉफी जिंकला' चाहत्यांची प्रतिक्रिया

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. बिग बॉसच्या घरात यंदा १६ स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान, ६ स्पर्धक फायनलिस्ट ठरले होते. यामध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, अभिनेत्री निक्की तांबोळी, गायक अभिजीत सांवत, डान्सर जान्हवी किल्लेकर, धनंजय पवार आणि रिलस्टार सूरज चव्हाण हे स्पर्धक होते. यामध्ये बारामतीच्या मातीतला सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीचा मान पटकवला.

सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यानंतर राजकीय मंडळी, सामाजिक स्तरातून सर्वत्रच त्याचे अभिनंदन होत आहे. बिग बॉस फेम, अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकतीच मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. निक्कीने सूरज चव्हाण विनर झाल्याने मी आनंदी असल्याचं म्हटलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीने, "सूरज जिंकेल याची मला कल्पना नव्हती. पण जर चाहत्यांनी त्याला विजेता बनवलं असेल तर त्याला नाकारणारी मी कोण? जे तुमच्या नशिबात असतं तेच तुम्हाला मिळतं. कदाचित बिग बॉसची ट्रॉफी माझ्या नशिबात नव्हती. माझ्या नशिबात खूप सारं प्रेम होतं, जे मला मिळालं. त्यामुळे मी आनंदी आहे",

पुढे तिने, "सूरज सहानुभूतीच्या जोरावर ट्रॉफी जिंकला अशा कमेंट्स मी वाचल्या होत्या. पण जर मी ती ट्रॉफी उचलली असती तर माझ्या चाहत्यांनी माझा द्वेष केला असता. आता चाहते त्याचा द्वेष करत आहेत. हे चक्र असंच सुरू असतं. त्यामुळे सत्य स्वीकारून आयुष्यात पुढे जायचं असतं." असं म्हणाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrigonda News : आघाडीची बिघाडी थांबेना; श्रीगोंदाच्या जागेवरून ठाकरे आणि पवार गटात रस्सीखेच

Bigg Boss 18: 'नहीं हो रही है हिंदी में बात...' भाषेवरून बिग बॉससोबत सदस्याची तू तू मैं मैं

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

हाताची कोपरं काळीकुट्टं झालीयेत? घराच्या घरी 'या' टीप्सने करा काळेपणा दूर

Sangli News: अय्यो! ओढ्याच्या पाण्यात वाहून आल्या ५०० च्या नोटा, आटपाडीकरांना लॉटरीच लागली; पैसे गोळा करायला तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT