Amruta- Prasad Kelvan News Instagram
मनोरंजन बातम्या

Amruta- Prasad Kelvan: प्रसाद- अमृताची लगीनघाई; केळवणाचा शेवटचा व्हिडीओ केला पोस्ट, आता लग्नाचे वेध

Amruta Deshmukh And Prasad Jawade News: बिग बॉस फेम प्रसाद आणि अमृता लग्नगाठ बांधणार असून नुकतंच त्याचे शेवटचे केळवण पार पडले.

Chetan Bodke

Amruta Deshmukh And Prasad Jawade Kelvan

‘बिग बॉस’फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे सध्या रिलेशन मुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांनीही रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले. येत्या १८ नोव्हेंबरला प्रसाद- अमृता लग्नगाठ बांधणार असून नुकतंच त्यांचा आणखी एक केळवणाचा कार्यक्रमही पार पडला. नुकतंच प्रसादच्या भावांनी प्रसाद आणि अमृताच्या केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कायमच प्रसाद- अमृता सोशल मीडियावर केळवणाचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतच अमृताने केळवणचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लास्ट केळवण असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना अमृताने “कदाचित हे शेवटचे केळवण असेल.” असं कॅप्शन दिलं आहे. (Social Media)

शेअर केलेल्या व्हिडीओत प्रसाद आणि अमृताला ओवाळताना दिसत आहे. सोबतच व्हिडीओमध्ये प्रसादचे चुलत भाऊ सुद्धा दिसत आहेत. त्यांच्या केळवणचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

(Entertainment News)

२२ जुलै रोजी या जोडीने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्यांनी एंगेजमेंटचे फोटोशूट (Engagement Photoshoot) देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. “आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत”, अशी हटके कॅप्शन अमृता देशमुखने पोस्टला दिली होती. सोबतच अभिनेत्रीने लग्नाची तारीख ही जाहीर केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला प्रसाद- अमृता लग्नबंधनात अडकणार असल्याचेही जाहीर केले आहे... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT