Abdu Rozik Instagram @abdu_rozik
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik In Gun Controversy: बिग बॉस फेम अब्दू अडचणीत; पोलिसांत तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

Bigg Boss Fame Abdu Rozik: अब्दुल एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Abdu Rozik's Restaurant In Mumbai: 'बिग बॉस 16' मधून सर्वांची मनं जिंकणारा अब्दु रोजिक सध्या खूप चर्चेत आहे. अब्दु रोजिकने मुंबईतील अंधेरी येथे 'बुर्गीर' हे रेस्टॉरंट सुरू केले, जिथे फराह खान, सोनू सूद, अर्चना गौतम आणि साजित खान यांसारख्या अनेक स्टार्सचीनी हजेरी लावली होती.

परंतु अब्दू रोजिक अडचणीत सापडला आहे. अब्दुल एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दू पिस्तूल लोड करताना दिसत आहे. त्याच्या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

गोल्डन बॉईजच्या बॉडीगार्डने अब्दू रोजिकच्या हातात बंदूक दिली होती. गोल्डन बॉईज सनी नानासाहेब वाघचौरे आणि सनी गुर्जर हे देखील अब्दु रोजिकच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या बॉडीगार्डनी ही बंदूक अब्दू रोजिकला दिली. (Latest Entertainment News)

बॉडीगार्डकडे पिस्तूल ठेवण्याचा परवाना असला तरी अब्दू रोजिकच्या हातात पिस्तूल पाहून लोकांनी प्रश्न उपस्थित केले. मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवणाऱ्या सामान्य नागरिकांनी म्हटले की जर चुकून बंदूक चालली असती तर तेथे उपस्थित लोक जखमी झाले. दरम्यान ओशिवाडा येथील अब्दूच्या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलेब्स उपस्थित होते.

'बिग बॉस तक'नुसार, मुंबई पोलिसांनी अब्दू रोजिकविरोधात तक्रार नोंदवली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी अब्दु रोजिक किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काही सोशल मीडिया युजर्सनीही मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, "गोल्डन बॉडीजच्या बॉडीगार्डचा परवाना रद्द करावा." दुसरीकडे, कठोर कारवाईची मागणी करत, दुसर्‍या नेटकाऱ्याने लिहिले की, "यावर कठोर कारवाई झाली पाहिजे."

अब्दु रोजिकसोबत लवकरच साजिद खानसोबत 'लाँग सन शॉर्ट सन' हा शो सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचा शो टीव्हीवर सुरू होणार की ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

SCROLL FOR NEXT