Marathi Bigg Boss Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi: 'बिग बॉस'चं दार उघडलं: 'ऑल इज वेल' म्हणत झाली स्पर्धकांची एन्ट्री

वादविवाद, मस्ती, टास्कचा थरार हे सर्व पाहायला मिळणार १०० दिवस बिग बॉसच्या घरात.

साम टिव्ही ब्युरो

मुबंई : बिग बॉस मराठी हा टिव्हीवरील एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. बिग बॉसच्या ४ च्या पर्वाला सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बिग बॉसचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश वामन मांजरेकर करत आहेत. बिग बॉस ४ हे पर्व 'ऑल इज वेल' या थीमवर आधारित आहे.

देवमाणूस फेम तेजस्विनी लोणारी, अभिनेता प्रसाद जवादे, अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्के, मिसेस मुख्यमंत्री या कार्यक्रमातून मालिकांमध्ये पदार्पण करणारी अमृता धोंगडे, 'सातारी बाणा' म्हणजेच किरण माने, 'स्प्लिट्सविला' फेम समृद्धी जाधव, अक्षय केळकर, फायटर योगेश जाधव, पुण्याची 'टॉकर'वडी अमृता देशमुख, ऑटोराणी यशश्री मसुरकर, डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे, प्रेक्षांमधील स्पर्धक त्रिशूल मराठे, अभिनेत्री रुचिरा जाधव आणि नृत्य दिग्दर्शक रोहित शिंदे हे स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले आहेत.

वादविवाद, मस्ती, टास्कचा थरार आणि प्रेम यासगळ्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी'. बिग बॉसचे चाहते नेहमीच या शोच्या प्रतीक्षेत असतात. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. एका घरातील १६ स्पर्धकांचा १०० दिवसांचा प्रवास सुरू झाला आहे. बिग बॉसचे चाहतेही मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Like And Subscribe: अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ OTT वर होणार रिलीज! कुठे अन् कधी पाहता येणार?

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

SCROLL FOR NEXT