Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये बॉक्सिंग थीमवर नॉमिनेशन टास्क पार पडला. काझी, माही, कनिका, लव्ह, अरिशफा, गुल्लू आणि मेरी कोम एलिमिनेशनच्या धोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०' हा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आता अधिकच रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे. प्रत्येक आठवड्याला स्पर्धकांमधील चुरस वाढताना दिसत असून, घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कची माहिती समोर आली असून, यावेळी बॉक्सिंगच्या थीमवर आधारित टास्क पार पडल्याचे सांगितले जात आहे. या टास्कमुळे घरातील अनेक स्पर्धकांवर एलिमिनेशनचे संकट आले आहे.

बॉक्सिंग रिंगमध्ये नॉमिनेशन टास्क

‘बिग बॉस तक’च्या माहितीनुसार, या आठवड्यात स्पर्धकांना बॉक्सिंग रिंगमध्ये जाऊन ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे, त्याच्या फोटोवर पंच मारायचा होता. यासोबतच प्रत्येक स्पर्धकाला आपल्या निर्णयामागचे कारणही स्पष्ट करावे लागले. त्यामुळे टास्कदरम्यान घरातील जुने वाद, मतभेद आणि स्पर्धकांमधील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले. या टास्कमध्ये उदितीला विशेष अधिकार देण्यात आला होता. तिला कोणत्याही एका स्पर्धकाला थेट नॉमिनेट करण्याची संधी मिळाली. उदितीने या अधिकाराचा वापर करत मेरी कोमला नॉमिनेट केले. त्यानंतर इतर स्पर्धकांनी आपापल्या पसंतीनुसार नावे घेतली.

कोणत्या स्पर्धकाने कोणाला केले नॉमिनेट?

यावेळी माही विजने अमन आणि अरिशफाला नॉमिनेट केले. मेरी कोमने माही विजचे नाव घेतले. आसिफ खानने लव्ह आणि कनिका यांना नॉमिनेट केले, तर लव्हने अमन आणि माहीला टार्गेट केले. काझी तौकीरने लव्ह गिल आणि कनिकाला नॉमिनेट केले. गुल्लूने केवळ ‘यंग डीएसए’चे नाव घेतले. अरिशफाने गुल्लू आणि कनिकाला नॉमिनेट केले. आम्रपाली दुबेने अमन आणि काझी यांचे नाव घेतले. ‘यंग डीएसए’ने गुल्लू आणि माही यांना नॉमिनेट केले. कनिकाने ‘लॉलीपॉप’ प्रकरणातील वादाचा संदर्भ देत काझी आणि अरिशफाला नॉमिनेट केले. अमनने काझी आणि लव्ह यांची नावे घेतली, तर स्काउटने काझी आणि माही यांना नॉमिनेट केले.

सात स्पर्धकांवर एलिमिनेशनचे संकट

या टास्कनंतर काझी तौकीर, माही, कनिका, लव्ह, अरिशफा, गुल्लू आणि मेरी कोम हे सात स्पर्धक एलिमिनेशनच्या धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही माहिती आतून लीक झाली असून, अंतिम नॉमिनेशन यादी आणि एलिमिनेशनचा निर्णय ‘बिग बॉस’कडून अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित होईल. गेल्या आठवड्यात रीती तिवारीला ‘बिग बॉस २०’चा निरोप घ्यावा लागला होता. आता या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार, हे प्रेक्षकांच्या मतांवर आणि ‘बिग बॉस’च्या अधिकृत निर्णयावर अवलंबून आहे.

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

SCROLL FOR NEXT