Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: 'वीकेंड का वार'मध्ये रंगला नवा ड्रामा, काझीमुळे भडकला सलमान खान; 'या' स्पर्धकाची केली चांगलीच कानउघाडणी

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने रीती तिवारी, काझी आणि इतर स्पर्धकांना सुनावले. काझी-रीतीच्या वादामुळे सलमान खानने सुनावले खडेबोल.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’चा आजचा ‘वीकेंड का वार’ चांगलाच रंगणार आहे. सलमान खान स्पर्धकांच्या वागणुकीवरून त्यांना खडे बोल सुनावताना दिसणार आहे. विशेषतः काझी आणि रीती तिवारी यांच्यातील वादावर सलमानचा फोकस राहणार असून, रीतीसाठी हा एपिसोड कठीण असण्याची शक्यता आहे.

एपिसोडच्या सुरुवातीलाच सलमान खान आक्रमक अंदाजात दिसतो. आठवडाभर स्पर्धकांविषयी प्रेक्षकांच्या मनात साचलेला राग बाहेर काढण्यासाठी मी आलो असल्याचे तो सांगतो. स्पर्धक बाहेरच्या जगाला दिसत आहेत, यावेळी त्यांची प्रतिमा चांगली बनतेय की खराब, हा महत्त्वाचा प्रश्न आहे असे सलमान नमूद करतो. तो ईशाला तिच्या खेळातील सध्याच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल करतो. तसेच कनिकाने स्वतःच्याच मैत्रिणीला ‘डेंजर झोन’मध्ये टाकल्याचेही तो सांगतो.

यानंतर सलमान ‘यंग’ला रँकिंग टास्क देतो.यामध्ये आपल्या मित्रांना क्रमवारी सांग असे तो बोलतो. यंग स्काउटला पहिल्या, आसिफला दुसऱ्या आणि लवला तिसऱ्या क्रमांकावर ठेवतो. त्यानंतर आम्रपाली चौथ्या, मेरी कोम पाचव्या आणि रीती सहाव्या क्रमांकावर ठेवतो.

यानंतर सलमान थेट रीतीला आरसा दाखवतो. रीतीला सलमान खान बोलतो, तू इथे रॉकस्टार बनायला आली आहेस. पण तुझी भाषा तशी मुळीच नाही तुझ्या भाषेमुळे तूला फरक पडलंच पण तूझ्या वडिलांना देखील फार फरक पडेल. घराबाहेर तुझ्यावर नेपोटिझममुळे इथे आल्याचा आरोप होतो आहे. त्यावरुन मला देखील तुला इथे आणल्याचं बोललं जात त्यामुळे तू तुझा खेळ सुधार. आता पुढे काय होणार हे प्रेक्षकांना आज रात्री ९ वाजता कलर्स टिव्हीवर होणाऱ्या विकेंड वारमध्ये कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री छगन भुजबळ पोहोचले येवल्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर..

शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र; 17 मोठ्या मागण्या

Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?

राजकारण जोमात! दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र; विखे थेट बाळासाहेब थोरातांच्या पाया पडले

Naigaon Travel : नायगावपासून हाकेच्या अंतरावर आहेत ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, फॅमिली ट्रिप करा प्लान

SCROLL FOR NEXT