Bigg Boss 20 Saaam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये काझी तौकीरच्या ‘गंजी गुडिया’ आणि ‘लॉलीपॉप’ कमेंटवरून वाद झाला. कनिका मानसह स्पर्धकांनी सवाल उपस्थित केल्यानंतर घरातील वातावरण तापले.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’च्या घरात सध्या स्पर्धकांमधील वाद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात काझी तौकीरच्या काही वक्तव्यांवरून घरातील स्पर्धकांनी त्याला जाब विचारला. काझीच्या बोलण्याचा डबल मिनिंग अर्थ होऊ शकतो या विचाराने घरच्यांनी त्याला जाब विचारला . विशेषतः त्याच्या ‘गंजी गुडिया’ (ganji gudiya) या कमेंटची जोरदार चर्चा झाली.

या मुद्द्यावर स्काउट-ऑपने काझीला त्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. स्काउटच्या म्हणाला,काझी तुम्ही गंजी गुड़ियाचे टास्क बिग बॉसमध्ये मिळतात असे म्हणाला होतात. यावर उत्तर देताना काझी म्हणाला माझे टेस्टोस्टेरॉन वाढले होते. म्हणून मी अस बोललो हे मी घरातील मुलींना ही सांगितले आहे.

काझीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही प्रेक्षकांनी काझीचा बचाव करत त्याच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे म्हटले. तर काहींनी त्याच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करत असे वक्तव्य नॅशनल टेलिव्हिजनवर करणे चुकं असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, कनिका मानने काझीच्या ‘लॉलीपॉप’ या टिप्पणीचाही मुद्दा उपस्थित केला. तिच्या दाव्यानुसार, काझीने अरिशफा खानला ‘तुला लॉलीपॉप हवा आहे का?’ असे विचारले होते. या कमेंटवर आसिफ खानसह इतर स्पर्धकांनीही आक्षेप घेत काझीला अशा प्रकारची थट्टा-मस्करी थांबवण्यास सांगितले.

यावर काझीने आपला बचाव करत, आपला हेतू चुकीचा नसल्यामुळे त्याच्या शब्दांचा नकारात्मक अर्थ काढला जाऊ नये, असे सांगितले. ‘तुम्ही लोक कसले मुद्दे उपस्थित करत आहात?’ असा सवालही त्याने केला. आपली चूक असेल तर ती मान्य करू, मात्र प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नका, असे काझी म्हणाला.

काझी तौकीर आणि आम्रपाली दुबे यांच्यात यापूर्वीही जोरदार भांडण झाली होती. त्यामुळे ‘बिग बॉस २०’च्या घरातील काझीचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. आता त्याच्या या वक्तव्यांवर घरातील सदस्य आणि प्रेक्षकांकडून पुढे काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

90,000 पगार, तरी BMW, Volvo, 2 Mercedes कुठून आले? 3 तासांच्या सुनावणीत न्यायमूर्तींचे सचिन वाझेंना धडाधड प्रश्न; जामिनावर काय निर्णय दिला?

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

SCROLL FOR NEXT