Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: सलमान खानची दमदार एन्ट्री! 'बिग बॉस २०'चा पहिला प्रोमो रिलीज; 'या' दिवशी होणार ग्रँड प्रीमियर

Bigg Boss 20: सलमान खानच्या 'बिग बॉस २०'चा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. ६ सप्टेंबरपासून शो सुरू होणार असून संभाव्य स्पर्धकांचीही चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: 'लॉक अप २' आणि 'द अलायन्स' या रिअ‍ॅलिटी शोजची सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू असतानाच, प्रेक्षकांच्या सर्वाधिक लोकप्रिय 'बिग बॉस'च्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. 'बिग बॉस हिंदी'च्या २० व्या सीझनचा पहिला प्रोमो आज (४ ऑगस्ट) प्रदर्शित करण्यात आला असून, यामधून अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खान एका घोड्यासह दमदार अंदाजात एन्ट्री करताना दिसतो. यावेळी तो म्हणतो, "करण अर्जुनमध्ये जे घडलं होतं, तेच आता 'बिग बॉस'मध्ये घडणार आहे... तथास्तु." या एका संवादानेच आगामी पर्वाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. प्रोमोच्या कॅप्शनमध्ये एक से भले दो असे लिहण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये नेमका कोणता मोठा ट्विस्ट असणार, याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

'बिग बॉस हिंदी २०'चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळीही प्रेक्षकांना हा शो जिओ, हॉटस्टार आणि कलर्स या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही नवे टास्क, नवे वाद आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, 'बिग बॉस २०'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबाबतही अनेक नावांची चर्चा रंगली आहे. माही विज, गीता बसरा, जन्नत जुबेर, फैसल शेख (मिस्टर फैसू), सुनील पाल, निया शर्मा, पर्ल व्ही पुरी आणि शोविक चक्रवर्ती यांची नावे संभाव्य स्पर्धक म्हणून समोर येत आहेत. मात्र, या नावांबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये नेमके कोणते सेलिब्रिटी 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार, याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Mirchi Bhaji Recipe: नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत टेस्टी शेंगदाणा-मिरची भजी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांचा बस प्रवास, पालकमंत्र्यांच्या साधेपणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

उपचाराला दिरंगाई? आई-बाळाचा मृत्यू; ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरोप

Jaggery Benefits : गुळाचे शरीराला होणारे हे फायदे कळले तर साखरेला म्हणाल ‘विष’!

Beauty Tips: मेकअप करताना 'या' चुका टाळा; नाहीतर चेहरा कायमचा होईल काळा आणि निस्तेज

SCROLL FOR NEXT