'Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19' च्या घरातून मास्टर माइंडचा पत्ता कट, नाव वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Bigg Boss 19 Elimination : 'बिग बॉस 19' च्या घरात आज 'वीकेंड का वार' रंगणार आहे. या आठवड्यात घरातील मास्टर माइंड स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये 'वीकेंड का वार'ला सलमान खान सदस्यांची शाळा घेताना दिसतो.

शोमध्ये या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन पार पडले आहे.

बिग बॉसच्या घरातून मास्टर माइंड स्पर्धकाचा पत्ता कट झाला आहे.

'बिग बॉस 19' सुरू (Bigg Boss 19) होऊन आतापर्यंत सात आठवडे झाले आहे. सात आठवड्यात गेम दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होताना दिसत आहे. घरात प्रेमाची, मैत्रीची नाती खुलताना दिसत आहेत. तसेच घरातील काही सदस्य एकमेकांचे शत्रू देखील झाले आहेत. आता पर्यंत बिग बॉसच्या घरातून तीन सदस्य बाहेर पडले आहेत. यात आवेज दरबार, नगमा मिरजकर आणि नतालिया जानोस्झेक यांचा पत्ता कट झाला आहे. तर घरात शहबाज बदेशा आणि मालती चाहर यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

बिग बॉसच्या घरात शनिवार, रविवार 'वीकेंड का वार' रंगतो. सलमान खान घरातील सदस्यांचे एकीकडे कौतुक करतो तर दुसरीकडे त्यांची चांगली शाळा घेतो. या आठवडयात बिग बॉसच्या घरातून कोणत्या सदस्यांची एक्झिट होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'बिग बॉस 19'च्या घरातील अपडेट देणारे अनेक सोशल मिडिया अकाउंट आहेत. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार घरातून मास्टर माइंड स्पर्धकाचा प्रवास संपला आहे.

'बिग बॉस 19' च्या घरात धक्कादायक एलिमिनेशन पार पडले आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी सहा सदस्य नॉमिनेट झाल होते. ज्यात जीशान कादरी (Zeishan Quadri) , नीलम गिरी,मृदुल तिवारी, बसीर अली, अशनूर कौर आणि प्रणित मोरेचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19' च्या घरातून या आठवड्यात जीशान कादरी यांचा पत्ता कट झाला आहे. कमी मत मिळाल्यामुळे त्यांचा घरातील प्रवास थांबला आहे.

'बिग बॉस 19'च्या घरीत जीशान कादरीला 'मास्टर माइंड' ही पदवी देण्यात आली. कारण तो बहुतेक वेळा घरातील सदस्यांसोबत बसायचा, त्यांचे बोलणे ऐकायचा आणि निरीक्षण करून आपला गेम खेळायचा. 'बिग बॉस 19'च्या घरात तो आपल्या विधानांमुळे खूप प्रसिद्ध झाला. जीशान कादरीच्या जाण्याने बॅकबेंचर ग्रुप तुटला आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर'मुळे जीशान कादरीला खूप लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनच्या मृतदेहावर ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?

Winter Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर उपाय, असा बनवा ऍव्होकॅडो आणि मध फेसपॅक

एक दिवस राज्य हातात द्या, नायकच्या अनिल कपूरसारखं काम करेल, पवारांचा आमदार असं का म्हणाला? VIDEO

Local Body Election : मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT