Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Bigg Boss 19-Nehal-Baseer Love Angle : 'बिग बॉस 19'च्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. नेहल आणि बसीरचे रोमँटिक क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.

व्हिडीओमध्ये नेहल आणि बसीरचे रोमँटिक क्षण पाहायला मिळत आहे.

नेहल आणि बसीरच्या नात्यावर घरातील सदस्यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बिग बॉसच्या (Bigg Boss 19) घरात रोजच्या भांडणानंतर आता कुठे तरी प्रेमाचे वारे वाहे लागले आहेत. सुरूवातील घरात तान्या मित्तल आणि अमाल मलिकच्या नात्याची चर्चा पाहायला मिळाली होती. त्यानंतर अभिषेत बजाज आणि अशनूर कौरच्या मैत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर गेल्या खूप वेळापासून सोशल मीडियावर बसीर अली आणि फरानाच्या क्यूट क्षणांचे व्हिडीओ व्हायरल होत होते. अशात आता मात्र बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन व्हिडीओने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बिग बॉसच्या घरात आता नवीन जोडी तयार होत आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बसीर अली (Baseer Ali) आणि नेहल (Nehal Chudasama) रोमँटिक मूडमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हिडीओत नेहलन बसीरच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेली पाहायला मिळत आहे. बसीर आणि नेहलला असे पाहून कुनिका त्यांना चिडवताना दिसते. कुनिका म्हणते की, "या क्षणांचा आनंद घ्यावा आणि भविष्याबद्दल जास्त काळजी करू नये." हे ऐकून बसीर अली आणि नेहल एकमेकांकडे पाहत राहतात आणि नेहल लाजते.

घरात हा लव्ह ड्रामा सुरू असताना यावर सदस्य चर्चा करताना देखील दिसतात. गौरव खन्ना फरहानाला सल्ला देत बोलतो की, "बसीर सोबतची मैत्री आणखी एक आठवडा टिकवून ठेवायला हवी होती, कारण तेव्हा घरातील वातावरण वेगळे असते." तेव्हा फरहाना बोलते की, "शोमध्ये राहण्यासाठी मला लव्ह अँगल दाखवण्याची गरज नाही." त्यानंतर अभिषेक फरहानाला विचारतो की, "बसीर आणि नेहलचे प्रेमप्रकरण किती खरा आहे." यावर फरहाना म्हणते की, "तिला बसीरच्या बाजूने खोटे वाटते आणि ती नेहलबद्दल काहीही सांगू शकत नाही." अभिषेक हसला आणि म्हणाला, "मला दोघांबद्दल माहिती आहे... ते फक्त परफॉर्म करत आहेत."

बसीर अली आणि नेहलचा लव्ह अँगल बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी केला प्लान आहे की खरंच दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे हे येणारा काळच सांगेल. मात्र या जोडीमुळे घरात नवीन राडा होणार हे निश्चित आहे. या आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात गौरव खन्ना, प्रणित मोरे, नेहल चुडासमा आणि बसीर अली यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT