Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 च्या घरातील नात्यांची समीकरण बदलले, एकदम 8 सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 19 Update : 'बिग बॉस 19' च्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. घरातील आठ सदस्य नॉमिनेट झाले आहे. नॉमिनेट सदस्यांची यादी जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये नॉमिनेशन टास्क दरम्यान खूप भांडणे पाहायला मिळाली.

घरातील 8 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

बिग बॉसच्या घरातील नात्यांचे समीकरण बदललेले पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 19'च्या घरात प्रत्येक सदस्य भांडताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यातील मित्र आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत. बिग बॉसच्या घरात नेहल आणि तान्या मित्तल मध्ये मोठे भांडण होते. अशात नुकताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला. यात वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला आहे. सदस्य एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. टास्कमध्ये नेमकं काय झाले, जाणून घेऊयात.

नॉमिनेशन टास्क

'बिग बॉस 19'ने शेअर केलेल्या व्हिडीओत नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांच्या नावाच्या बोटी पाहायला मिळतात. ज्या व्यक्तींची बोट तीन क्षेपणास्त्रांनी धडकेल त्याला नॉमिनेट केले जाते. नॉमिनेशन टास्कमध्ये घरातल्या सदस्यांनी एकमेकांना चांगलेच सुनावले आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये नेहलने झीशानला नॉमिनेट केले. फरहानाने अशनूरला नॉमिनेट केले. अमाल मलिकने कुनिकाचे नाव घेतले.

'बिग बॉस 19' च्या घरातून 8 सदस्य नॉमिनेट झाले आहे. नॉमिनेट सदस्यांची नावे खालीलप्रमाणे-

  • अमाल मलिक

  • नेहल चुडासमा

  • कुनिका सदानंद

  • अशनूर कौर

  • नीलम गिरी

  • प्रणित मोरे

  • तान्या मित्तल

  • झीशान कादरी

आवेज दरबार एक्झिट

गेल्या आठवड्यात 'बिग बॉस 19' च्या घरातून आवेज दरबारची एक्झिट झाली आहे. मात्र त्याच्या जाण्याने घरातील अनेक सदस्यांना तसेच प्रेक्षकांना वाईट वाटले आहे. आतापर्यंतचे हे शॉकिंग एलिमिनेशन होते. आठ सदस्यांमधून या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT