Bigg Boss 19 Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: अशनूर कौरने जाणूनबुजून तान्या मित्तलला मारलं; 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानने अभिनेत्रीला झापलं

Bigg Boss 19 : वीकेंड का वार चा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान अशनूर कौरवर टीका करताना दिसत आहे. सलमान खान म्हणतो की अशनूरने जाणूनबुजून तान्या मित्तलला मारलं

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19: बिग बॉस १९ च्या या आठवड्यात खूप नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. 'टिकट टू फिनाले' टास्क दरम्यान, अशनूर कौर आणि तान्या मित्तल यांच्यात खूप भांडण झाले. टास्क दरम्यान अशनूरने तान्या मित्तलला लाकडी फळीने मारले. आता, सलमान खानने त्या मुद्द्याबद्दल अशनूर कौरला फटकारताना दिसला. सलमान खान अशनूरला घराच्या नियमांची आठवण करून देईल.

अशनूरने घराचा नियम मोडला

वीकेंड का वारच्या प्रोमोमध्ये, सलमान खान अशनूरला सांगतो की तिने जाणूनबुजून तान्या मित्तलला लाकडी फळीने मारले. अशनूर तिचे स्पष्टीकरण देत असताना, सलमान खान संतापतो आणि अशनूरला सांगतो की तिने घराचा नियम मोडला.

अशनूरने जाणूनबुजून तान्याला मारलं

प्रोमोमध्ये, सलमान म्हणतो, "अशनूर, कोणावर हात उचलणे किंवा कोणाला दुखवणे बिग बॉसच्या घरात चालत नाही." सलमानचे म्हणणे ऐकल्यानंतर, अशनूर माफी मागते. सलमान म्हणतो की अशनूरचा आक्रमकपणा इतका जास्त होता की तिने तान्याला लाकडी फळीने मारले आणि अशनूरने हे जाणूनबुजून केलं हे दिसून येत.

सलमान खान निकाल जाहीर करणार

सलमान खान नंतर अशनूरला सांगतो की घरात काही नियम आहेत आणि ते पाळले पाहिजेत. बिग बॉसच्या घरात असा नियम आहे की जो कोणी स्पर्धक हिंसाचारात सहभागी होईल त्याला घराबाहेर काढले जाते. काही वृत्तांनुसार, या वर्तनामुळे अशनूरला अंतिम फेरीपूर्वी बिग बॉसच्या घराबाहेर काढले जाईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCPच्या नेत्यावर दिवसाढवळ्या गोळीबार; अज्ञात हल्लेखोरांचा बांगलादेशात कहर

Tuesday Horoscope: जवळचा व्यक्तीच देईल धोका, ५ राशींचा पैसा जाणार वाया; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: डोंबिवली येथील लक्ष्मी सागर इमारतीच्या टेरेसच्या भिंतीचा भाग कोसळला

Migraine Pain: मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी 'या' सवयींचे पालन करणं अत्यंत महत्वाचं

Diabetes Bad Habits: डायबेटिसचा त्रास आहे? ही १ वाईट सवय झटक्यात वाढवते ब्लड शूगर लेव्हल, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT