Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'चा पहिला कॅप्टन ठरला, गौरव खन्ना अन् बसीर अलीच्या भांडणात 'या' सदस्याने मारली बाजी

Bigg Boss 19 First Captain : 'बिग बॉस 19'च्या घरात पहिला कॅप्टन ठरवण्यात आला आहे. कोणत्या सदस्याने बाजी मारली,जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नुकताच 'बिग बॉस 19'च्या घरात पहिला कॅप्टनसी टास्क पडला आहे.

कॅप्टनसी टास्कमध्ये देखील भांडणे पाहायला मिळाली.

कॅप्टनसी टास्कमध्ये बिग बॉसने बसीर अलीला जज बनवले.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात पहिला कॅप्टनसी टास्क पार पडला आहे. यात देखील घरातील सदस्यांनी तुफान राडा घातला आहे. कॅप्टनसी टास्कचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यंदा बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य सुरुवातीपासूनच आपला दमदार खेळ दाखवत आहेत. कॅप्टन्सी टास्कमध्ये नेमकं काय घडले, जाणून घेऊयात.

कॅप्टन टास्कमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅप्टनसी टास्कमध्ये बिग बॉसने बसीर अलीला जज बनवले. त्याला अंतिम निर्णय सांगण्याचा अधिकार देतात. कॅप्टन टास्कमध्ये बसीर अली आणि गौरव खन्नाचे मोठे भांडण होताना दिसते. तसेच यांच्यासोबतच सीझनच्या पहिल्या दिवसापासून अमाल मलिक आणि जीशान कादरी भांडताना दिसत आहेत. एकीकडे भांडणे चालू असताना बिग बॉसमधील एका सदस्याने बाजी मारून कॅप्टनसी टास्क जिंकला आहे.

'बिग बॉस 19'ची पहिली कॅप्टन कुनिका सदानंद झाली. कुनिका सदानंद पहिल्या दिवसापासून 'बिग बॉस 19'मध्ये दमदार खेळ खेळत आहे. आता कुनिका सदानंदच्या सरकारमध्ये बिग बॉसच्या घरात नवीन कोणता राडा होता हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. अलिकडेच घरात डाळवरून मोठे भांडण झालेले पाहायला मिळाले आहे.

नॉमिनेट सदस्यांची नावे

'बिग बॉस 19'च्या पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत 7 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. गौरव खन्ना, झीशान कादरी, अभिषेक बजाज, नीलम गिरी, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि नतालिया जानोस्जेक यांचा यात समावेश आहे. चाहते आता 'वीकेंड का वार' ची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

'बिग बॉस 19' कुठे पाहाल?

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज की बात राज रहने दो; राज ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान | VIDEO

Maharashtra Live News Update: अकोला शहराजवळील गुडधी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस

Crime News: भयंकर! तांत्रिकानं आजोबाचं डोकं फिरवलं; चार दिशेला फेकले नातवाच्या शरीराचे तुकडे

New OTT Release: विकेंड होणार धमाकेदार; 'हे' चित्रपट आणि वेब सिरीज होणार 'या' विकेंडला प्रदर्शित

Car Crash : मराठा आंदोलकांच्या कारचा भीषण अपघात; तिघेजण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT