Bigg Boss 19 Winner SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 Winner : 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' स्पर्धक आघाडीवर

Bigg Boss 19 Finale Voting : सध्या सर्वत्र 'बिग बॉस 19'च्या विजेत्याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही तासांत 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले सुरु होणार आहे. विजेता कोण होणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले काही तासांमध्ये सुरू होणार आहे.

'बिग बॉस १९'चे चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला भरपूर मत देत आहेत.

'बिग बॉस १९' च्या विजेत्यांच्या नावांमध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि अमाल मलिकच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले आता काही तासांवर आला आहे. काही तासांत बिग बॉसला त्याच्या 19 व्या सीझनचा विजेता भेटेल. 'बिग बॉस 19' च्या ग्रँड फिनालेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेले तीन महिने हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. बिग बॉसने निकाल सांगण्याआधीच प्रेक्षकांनी आपला विजेता ठरवला आहे. कोण? तो जाणून घेऊयात.

'बिग बॉस 19'चे प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी भरपूर मतदान करताना दिसत आहेत. त्यामुळे 'बिग बॉस 19' च्या अंतिम फेरीतील मतदानाचे आकडे पटापट बदलताना दिसत आहेत. लेटेस्ट मतदानानुसार कोणत्या सदस्याने बाजी मारली पाहा. बिग बॉसला आपले टॉप 5 स्पर्धक भेटले आहेत. खेळाच्या सुरुवातीपासूनच हे सदस्य प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

'बिग बॉस 19'चे टॉप 5 स्पर्धक

'बिग बॉस 19' चा विजेता कोण?

'बिग बॉस 19' च्या अंतिम फेरीतील मतदानानुसार, गौरव खन्ना आणि प्रणित मोरे दोघेही आघाडीवर आहे. तिसऱ्या-चौथ्या स्थानावर फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल पाहायला मिळत आहे. तर पाचव्या स्थानावर अमाल मलिक आहे. व्होटिंगमध्ये प्रणित मोरे आणि अमाल मलिकच्या स्थानांमध्ये अदलाबदल होताना दिसत आहे. कधी अमाल टॉप 2 मध्ये दिसत आहे तर कधी प्रणित मोरे. मात्र विजेत्याचे पद गौरव खन्नाच्या नावावर सुरुवातीपासून दिसत आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, जास्त मत आणि पाठिंबा गौरव खन्नाला मिळत आहे. त्यामुळे निकालाआधीच गौरव खन्नाच्या चाहत्यांनी त्याला 'बिग बॉस 19' चा विजेता म्हणून घोषित केले आहे.

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वाजता जिओ सिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री 10:30 वाजता पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT