Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'मला इथे यायचं नव्हतं...' म्हणतं सलमान झाला भावुक, Bigg Boss 18 च्या सेटवर नेमकं काय घडलं?

Salman Khan : 'बिग बॉस 18' दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. अशात 'वीकेंड वार'ला सलमान खानने आपल्या मनातली भावना व्यक्त केल्या आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या चर्चेत आहेत. आता 'बिग बॉस 18'चा दुसरा 'वीकेंड वार' सुरू आहे. सलमान खानने पुन्हा बिग बॉसचं शूटिंग सुरू केलं आहे. गेल्या आठवड्यात बाबा सिद्दीकींच्या निधनानंतर सलमानने बिग बॉसचे शूटिंग थांबवलं होत. आता सलमान खानला लॉरेन्स बिष्णोईंकडून धमकी मिळाली आहे. तरी देखील भाईजान 'बिग बॉस 18'चा दुसरा 'वीकेंड वार' शूट करत आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी सेटवर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

'बिग बॉस 18'च्या 'वीकेंड वार'ला भाईजान आपल्या मनातील दुःख व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान खान शिल्पा शिरोडकरला समजावताना दिसत आहे. शिल्पा आणि अविनाश या दोघांच्या जेवणाच्या भांडणांवरून सलमान खान (Salman Khan) शिल्पाला (shilpa shirodkar) समजावत असतो. सलमान शिल्पाला म्हणतो की, "या घरात कोणतेही भावनिक नाते जोडू नका. मला देखील आज येथे यायचं नव्हतं. परंतु कामासाठी कराव लागतं. वर्क कमिटमेंट आहे. मला तुम्हाला भेटायचं नव्हतं. जर कोणावर लांच्छन लागत असेल तर त्याच्या कुटुंबावर परिणाम होतो. माझ्यावरही आता अनेक लांच्छन लावण्यात आले आहे. मला काय वाटत आहे, हे माझे मला माहित." असे सलमान खान बोलतो.

पुढे सलमान खान म्हणतो की, "माझ्या आई-वडिलांनी खूप सहन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होत आहे हे माझे मला माहित आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. " या शब्दात सलमान खानने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आज 'वीकेंड वार' मध्ये काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT