Shilpa Shetty Fitness Tips : 49 व्या वर्षीही शिल्पा फिट अ‍ॅण्ड फाइन, वाचा डाएट रूटीन

Shilpa Shetty Diet Plan : बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी वयाच्या 49 व्या वर्षी देखील एवढी फिट आणि ब्युटिफुल कशी जाणून घेऊयात.
Shilpa Shetty Diet Plan
Shilpa Shetty Fitness TipsSAAM TV
Published On

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. तिच्या हटके स्टाइलने आणि सौदर्यांने चाहते घायाळ होतात. शिल्पाने अनेक हिट चित्रपट केले आहेत. शिल्पा शेट्टी वयाने मोठी असली तरी एखाद्या कॉलेज गर्ल प्रमाणे तरुण आणि हिट दिसते. शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अभिनेत्री शिल्पाने तिच्या अभिनयातून सर्वांची मने जिंकली आहेत. तिचे फिटनेसवर प्रचंड प्रेम आहे. ती नेहमी योगा, व्यायाम आणि डाएटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री स्वत:ला फिट (Fitness ) ठेवण्यासाठी योगा, जिम करत असते. तिच्या एकंदर वर्कआउट रूटीनमुळे तिने सौंदर्यात अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे. अभिनेत्री स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी काय डाएट (Diet Plan) फॉलो करते जाणून घ्या.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्वत:ला निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. शिल्पा रोज सकाळी उठून योगा करते. योगाने शरीर तंदुरुस्त राहते. तसेच शरीर लवचिक बनते. शिल्पा वेगवेगळ्या योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेत असते. त्यामुळे ती तिच्या शरीराला अजून सुदृढ ठेवते. शिल्पाला योगाची खूप आवड असल्याने ती मनःशांतीसाठी योगा करते. त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या फिटनेस रूटिनमध्ये एरोबिक डान्स करते. एरोबिक डान्समुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिल्पा नियमित कार्डिओ करून स्वत:ला आणखी फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे स्नायू मोकळे होतात. कंबर, हात आणि खांदे यांना बळकटी येते.

अभिनेत्री रोज डाएट फॉलो करते. शिल्पा सकाळी दलिया आणि ग्रीन टीचा नाश्ता करते. त्यानंतर योगा करून खजूर, मनुका यांचे सेवन करते. योग सेशन नंतर शिल्पा प्रोटीन शेकचा आस्वाद घेते. शिल्पा दुपारच्या जेवणात भरपूर भाजी, डाळ, चपाती आणि भात असे भोजन करते. शिल्पाला ब्राउन ब्रेड, पास्ता, ब्राउन शुगर, ब्राउन राइस यांसारखे पदार्थ खायला फार आवडतात. हे आरोग्यासाठी हेल्दी ठरतात. हे पदार्थ पचनास चांगले असल्याने शिल्पा या पदार्थाचं सेवन नियमित करते. तिचा आहार कार्बोहाइड्रेट आणि प्रथिनेयुक्त पदार्थांनी भरपूर असतो. 7-8 च्या दरम्यान शिल्पा रात्रीचे जेवण करते. ती बाहेरचे पदार्थ खाणे टाळते. तसेच नियमित भरपूर पाणी पिते. ज्यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते.

Shilpa Shetty Diet Plan
Anita Hassanandani : तो आमच्यासमोर पॅन्ट काढायचा...अनिता हसनंदानीने शेअर केला लहानपणीचा भयानक किस्सा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com