Gunaratna Sadavarte Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gunaratna Sadavarte: लॉरेन्स बिश्नोई प्रकरणात सदावर्तेंची उडी; म्हणाले, "सलमानला मदत करणार पण..."

Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावर्ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ज्यामुळे ते पु्न्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Manasvi Choudhary

Lawrence Bishnoi: बिग बॉस हिंदी सीझन १८ सध्या चांगलंच गाजतय. बिग बॉस हिंदीमध्ये गुणरत्न सदावर्ते कायमच चर्चेत आहेत. केवळ १० दिवसांतच गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. अशातच बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावर्ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ज्यामुळे ते पु्न्हा एकदा चर्चेत आले आहेत.

बिग बॉसच्या घरात एन्ट्री करत गुणरत्न सदावर्तेने साऱ्यांचेच लक्ष वेधले. बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. १० दिवसांचा प्रवास संपल्यानंतर गुणरत्न सदावर्तेनी मुलाखती दिल्या आहेत. नुकतंच झालेल्या एका मुलाखतीत, गुणरत्न यांना बाबा सिद्धीकी यांच्याविषयी विचारण्यात आले. यावर गुणरत्न म्हणाले की,'बाबा सिद्धीकींच्या आयुष्याबद्दल मला माहित नाही. मी एवढं ऐकलं नाही. मात्र मी एवढं म्हणतो की बॉलिवूड कलाकारांनी कधीही अंडरवर्ल्डच्या छत्रछायेत जाऊ नये. तसेच त्यांच्या संपर्कात न येता दूर राहिले पाहिजे. कारण तुमचे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी विविध भूमिका साकारता...'

सलमान खानला मिळणाऱ्या धमकीबद्दल पुढे सदावर्ते यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी इतकंच सांगेन की, त्याने कायद्यासोबतच धर्मगुरू आणि धर्मपंडितांचा सल्ला घ्यायला पाहिजे. बिश्नोई समाजसुद्धा हिंदू राष्ट्र मानणारा समाज आहे, त्यामुळे नक्कीच काहीतरी चांगलं होईल. जर सलमानला कोणती मदत पाहिजे असेल तर मी नक्की करेन.' असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT