Vicky Jain Mother On Ankita Lokhande Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: कुटुंबाच्या विरोधात जाऊन विकीने केलं लग्न, अंकिता लोखंडेची सासू स्पष्टच बोलली

Vicky Jain Mother On Ankita Lokhande: सध्या या शोमध्ये फॅमिली वीक सुरू आहे. या दोघांना सपोर्ट करण्यासाठी अंकिता लोखंडेची आई आणि विकी जैनची आई बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विकीच्या आईने मोठं विधान केले आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain Wedding:

सलमान खानचा (Salman Khan) प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17' ची (Bigg Boss 17) चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. या शोला लवकरच विनर मिळणार आहे. सध्या या शोमध्ये फॅमिली वीक सुरू आहे. या दोघांना सपोर्ट करण्यासाठी अंकिता लोखंडेची आई आणि विकी जैनची आई बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या. यावेळी विकीच्या आईने म्हणजेच अंकिताच्या सासूने तिला चांगलेच सुनावले. सासूचे बोलणं ऐकून अंकिता संतापली.

आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विकी जैनच्या आईने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विकी जैनच्या आईने खुलासा केला आहे की, 'विकी आणि अंकिताचे लग्न कुटुंबाच्या विरोधात झाले होते.'

बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानतर विक्की जैनच्या आईने पिंकविलाला मुलाखत दिली. ज्याची एक छोटीशी क्लिप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत विकीच्या आईने सांगितले की, 'विकीने अंकिताशी लग्न केले. पण आमची या लग्नाला मान्यता नव्हती. विकीने लग्न केले आहे आता तो निभवायला देखील तयार आहे. आम्ही ऐवढ्या दिवसांपासून सर्व काही बघत आहोत. पण काही बोलत नाहीये. तो बाहेर येईल आणि नातं सुधारेल. जर नातं बिघडलं असेल तर तो सुधारेल देखील. आम्हाला विश्वास आहे की तो सर्व काही करेल.'

विकी आणि अंकिता यांनी इतर स्पर्धकांशी जवळीक करण्यावरून देखील भांडण केले आहे. यावर आपले मत व्यक्त करताना विकीच्या आईने अंकिताबद्दल सांगितले की, 'जर तुला त्याला मोकळीक द्यायची नाही, तर आधी स्वत:ला सुधार. इतरांकडून काहीही करून घेण्यापूर्वी ते आधी स्वतःच केले पाहिजे.' तर, 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या आईमध्ये थोडसं भांडण झालं होतं. विकीला लाथ मारल्यामुळे अंकिताची सासू तिच्यावर नाराज आहे.

मंगळवारी समोर आलेल्या प्रोमोमध्ये आपण हे पाहिले आहे की, विकीच्या आईने अंकिताला सांगितले होते की, 'जेव्हा तू विकीला लाथ मारली तेव्हा पप्पांनी थेट तुझ्या आईला फोन करून विचारले होते की तूही तुझ्या नवऱ्याला अशाच प्रकारे लाथ मारत होती का?' सासूचे बोलणं ऐकून अंकिता लोखंडे चिडते आणि बोलते की, 'माझ्या आई-वडिलांवर जाऊ नका' आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विकी आणि अंकिताचं नातं कसं राहिल हे पाहणं महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT