Arun Srikanth Mashettey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arun Srikanth Mashettey : 'बिग बॉस' फेम अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, VIDEO शेअर करत दिली गुडन्यूज

Bigg Boss Contestant Pregnancy Announcement : 'बिग बॉस' फेम अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस'चे कलाकार कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अशात एका 'बिग बॉस' कलाकराने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोशल मिडिया त्याने एक खास पोस्ट केली आहे. 'बिग बॉस 17' चा (Bigg Boss 17 ) अंतिम फेरीत पोहोचलेला स्पर्धक अरुण श्रीकांत मॅशेट्टी आता लवकरच बाबा होणार आहे. अरुण एक ( Arun Srikanth Mashettey)प्रसिद्ध युट्यूबर देखील आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. अरुण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.

अरुण श्रीकांत मॅशेट्टीची बायको आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यांनी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. अरुणला आधी एक गोंडस मुलगी आहे. आता तो लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की,"कब 2 से 3 और 3 से चार हो गए" त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये अरुणची बायको त्याला आपण प्रेग्नेंट असल्याचे सांगत आहे. मागे त्यांची छोटी मुलगी देखील पाहायला मिळत आहे. अरुण आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच भारी वाटत आहे. व्हिडीओमध्ये ते दोघे सुद्धा इमोशनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बायकोच्या हातात प्रेग्नंसी किट दिसत आहे.

बिग बॉस 17

'बिग बॉस 17'मध्ये असतानाचा अरुणचा खेळ प्रेक्षकांना खूप आवडला. तो शेवटी टॉप 5 पर्यंत पोहचला. मात्र त्याला टॉफी जिंकता आली नाही. 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकी झाला. बिग बॉस 17 हा सीझन चांगलाच गाजला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

SCROLL FOR NEXT