Sonia Bansal Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonia Bansal Hospitalized : ‘बिग बॉस १७’ फेम सोनिया बन्सल रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीला नेमकं काय झालंय ?

Sonia Bansal Panic Attack : 'बिग बॉस 17' फेम अभिनेत्री सोनिया बन्सलच्या महत्वाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री सोनिया बन्सल हिला एका अवॉर्ड शोनंतर घरी परतत असताना अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस 17' फेम अभिनेत्री सोनिया बन्सलच्या हेल्थबद्दल महत्वाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री सोनिया बन्सल हिला एका अवॉर्ड शोनंतर घरी परतत असताना अचानक तब्येत बिघडली आहे. अभिनेत्रीला घरी येत असताना पॅनिक अटॅक आला असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीची प्रकृती ठीक नसून तिच्या हेल्थची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून तिच्या तब्येतीची विचारपूस करीत आहेत.

सोनिया बन्सलचा सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिला मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया काल रात्री नेक्सा अवॉर्ड्समधून घरी परतत असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी तिला पॅनिक अटॅक आला. अभिनेत्रीच्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री गेल्या ४ महिन्यांपासून पॅनिक अटॅक या आजाराचा सामना करीत आहे.

मानसिक आजाराशी झुंज देण्याचा ती खूप प्रयत्न करत होती. मात्र तिची प्रकृती ढासळली आणि तिला पॅनिक अटॅक सुरु झाले. सध्या तिला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्यास सांगितलं असून दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. सोनिया लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे फॅन्स, मित्रमंडळी आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. सानिया बन्सल सर्वाधिक प्रसिद्धी झोतात 'बिग बॉस 17' पासून आली आहे. सर्वात पहिली तिच या शोमधून बाहेर पडली होती.

दरम्यान, सोनिया बन्सल मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही ती दिसली आहे. सोनिया बन्सल कायमच इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या क्यूटनेसवर चाहते फिदा आहेत. सोनिया लवकरात लवकर बरी होण्यासाठी फॅन्स देवाकडे प्रार्थना करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT