Ankita Lokhande And Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande: 'आम्हाला जगू द्या...', विकी जैनसोबतच्या नात्यावरून सतत ट्रोल करणाऱ्यांना अंकिता लोखंडेने दिलं उत्तर

Ankita Lokhande Answers To Trollers: बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी जैन यांच्यात भांडणं झाली. या भांडणामुळे ट्रोलर्स अंकिताला खूप टार्गेट करत आहेत. आता अंकिताने या प्रकरणावर मौन तोडले आहे. तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) शो दोन आठवड्यांपूर्वी संपला. या शोमध्ये सहभागी झालेले अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) हे कपल खूप चर्चेत राहिले. या दोघांची केमिस्ट्री, त्यांची भांडणं, रुसवे-फुगवे प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता या शोमधून बाहेर पडल्यानंतरही अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची चर्चा होत आहे. हे कपल अजूनही चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी जैन यांच्यात भांडणं झाली. या भांडणामुळे ट्रोलर्स अंकिताला खूप टार्गेट करत आहेत. आता अंकिताने या प्रकरणावर मौन तोडले आहे. तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. त्याचसोबत तिने विकी आणि तिच्या नात्याबद्दल स्पष्टपणे सांगितले. आम्हाला जगू द्या, अशी विनंती तिने ट्रोलर्सकडे केली आहे.

बिग बॉस सीझन 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात बरीच भांडणे झाली. ज्यामुळे त्यांच्या पती-पत्नीच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. हे दोघेही वेगळे होणार, त्याच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा होत होत्या. हे कपल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. आता त्यांच्यामध्ये खूप प्रेम दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरातील वागण्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.

अशामध्ये नुकताच अंकिता लोखंडेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. तिने सांगितले की, 'जेव्हा मी बिग बॉसमधून बाहेर पडली तेव्हा मला खूप दडपण जाणवत होते. मीडियाला आमच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न पडले. विकीसोबत झालेल्या भांडणाचा माझ्यावर खूप वाईट परिणाम झाला आहे. अशा काही गोष्टी होत्या ज्या मी सांगायला नको होत्या आणि काही गोष्टी विकीने सांगायला नको होत्या.'

अंकिता लोखंडेने पुढे सांगितले की, 'पण पती-पत्नीच्या नात्यात भांडणे होत राहतात हे ठीक आहे. याचा अर्थ त्यांच्या नात्याकडे बोटं दाखवावीत असे नाही. जे हे करत आहेत त्यांना मी म्हणेन की, आम्हाला जसे जगायचे आहे तसे जगू द्या. विकी आणि मी एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत.', अशापद्धतीने अंकिताने ट्रोलर्सला उत्तर देत हे सर्व थांबवण्याची त्यांच्याकडे विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

SCROLL FOR NEXT