Ayesha Khan On War Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayesha Khan On War: रफाहमधील तो व्हिडिओ पाहिला अन्...; अभिनेत्री आयशा खान युद्धाचा निषेध करत ढसाढसा रडली; व्हिडिओ केला शेअर

Ayesha Khan Share Video On Isarel Hamas War: सध्या जगभरात इस्त्रायल- हमास युद्धाची चर्चा सुरु आहे. रफाह शहरावर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. यात अनेक नागरिकांना मृत्यू झाला. त्याच संदर्भात अभिनेत्री आयशा खानने व्हिडिओ शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात सध्या इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाची चर्चा सुरु आहे. इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध वाढतच आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना त्रास होत आहे. इस्त्रायलने रविवारी गाझामधील रफाह शहरावर हल्ला केला. त्यासंदर्भात आता बॉलिवूड अभिनेत्री आयशा खानने व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री आयशा खानने सोशल मीडियावर पोस्ट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे, २६ मे रोजी इस्त्रायलने रफाह शहरात राहणाऱ्या पॅलेस्टिंनींवर हल्ला केला. त्यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. हे दृश्य फार हृदयद्रावक असल्याचे आयशा खानने म्हटले आहे.

आयशा खानने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'आपण सर्वजण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल जागरुक आहोत. आपण इथे खूप चांगले जीवन जगत आहोत. परंतु तेथील लोकांना होणारा त्रास हा खूप हृदयद्रावक आहे. तेथे लोक अत्यंत वाईट परिस्थितीत राहत आहे. ते आगीत जळत आहेत. तर काही मारले गेले आहे. हे खूप निराशाजनक आहे. मी नुकतेच रफाहमधील लोकांचे व्हिडिओ पाहिले आहेत. त्यात अनेक लोक जिवंत जळताना दिसत आहे.या सगळ्याविरोधात आपल्याला आवाज उठवण्याची गरज आहे. आपल्याला ही गुन्हेगारी आणि राग संपुष्टात यावा, यासाठी प्रार्थना करायला हवी. मला आशा आहे की, हे सर्व लवकर संपेन'. आयशा खान व्हिडिओ बनवताना ढसाढसा रडताना दिसत आहे. तिने रफाहमधील लोकांसाठी प्रार्थना केली आहे.

आयशा खानसोबतच अनेक सेलिब्रिटींनी इस्त्रायल हमासमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. आयशा खान ही बिग बॉस १७ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यानंतर आयशा लवकर एका मल्ल्याळम चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT