Ankita Lokhande And Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: अंकिता लोखंडेचा राग अनावर, पती विकी जैनला चप्पल फेकून मारली; काय आहे कारण?

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain Video:

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉसचा 17वा सीझन (Bigg Boss 17) चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. सततचे वाद, गॉसिप करत हे स्पर्धक चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. बिग बॉसच्या घरात असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अशामध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे सर्वाधिक प्रसिद्धी मिळवत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी बिग बॉसच्या घरामध्ये एकत्र एन्ट्री केली. पण बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून या कपलमध्ये सतत वाद होताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून या कपलमधील दुरावा वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. अशामध्ये आता अंकिताने घरातील सर्व सदस्यांसमोर पती विकी जैनला चप्पल फेकून मारल्याचं समोर आलं आहे. अंकिताने असं का केलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

'बिग बॉस 17' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिता लोखंडेला पती विकी जैनचा खूप राग येतो. अंकिता विकीला इतर सदस्यांसममोर खोटं बोलताना पकडते. त्यामुळे तिला खूप राग येतो. अंकिताचा आपल्या रागावरील ताबा सुटतो आणि ती विकीवर चप्पल फेकून मारताना दिसते. घडलं असं की, या शोमध्ये मुनव्वर फारुकी प्रश्न उपस्थित करतो की, 'दिमाग का घर'मध्ये राहणाऱ्या विकीने ईशा मालवीय आणि इतर सदस्यांसोबत जेवण शेअर केले होते का? 'दिल का घर'मध्ये राहणाऱ्या ईशाने मुनव्वरला सांगितले की, 'दम का घर'च्या खानजादीने दिमागच्या घरातील सदस्यांनी शिजवलेले अन्न खाल्ले होते. मात्र, विकी आणि खानजादी ईशाच्या दाव्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतात.

विकी आणि खानजादी आरोप फेटाळत असताना अंकिता लोखंडेही तिथे येते. जेव्हा अंकिताला सर्व काही कळते तेव्हा तिने खुलासा केला की, तिने खानझादीला 'दिमाग का घर'मधील सदस्यांचे जेवण खाताना पाहिले होते. यानंतर विकी मस्करी करत अंकिताची मान मागून पकडून तिला ओढतो. अंकिताने विकीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता विकीने तिला मागून पकडून तिचा हात धरला. या मस्करीदरम्यान अंकिता विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली. पण तो न थांबल्याने अंकिताने तिची चप्पल काढली आणि विकीवर फेकून मारली. या दरम्यान घरातील बाकीचे सदस्य मजा घेताना आणि अंकिता लोखंडेला प्रोत्साहन देताना दिसले. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT