MC Stan Life Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

कव्वालीपासून ते एक रॅपर... MC Stanची डाऊन टू अर्थ स्टोरी, आता आहे कोट्यावधीचा मालक

'बिग बॉस १६'च्या घरात सध्या टॉप ५ मध्ये शिव ठाकरे, MC स्टॅन, शालिन भानोत, अर्चना गौतम आणि प्रियांका चौधरी चहर हे स्पर्धक आहेत.

Chetan Bodke

MC Stan Story: टेलिव्हिजनवरील सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणजे, 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस १६' चा अवघ्या काही तासांवरच ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे ती, विजेत्या स्पर्धकाचे नाव ऐकण्याची. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'बिग बॉस १६'चा विजेता कोण होणार याची चर्चा जोमात सुरु होती. पण आज या प्रश्नाचे उत्तर अखेर सर्वांना मिळणार आहे.

'बिग बॉस १६'च्या घरात सध्या टॉप ५ मध्ये शिव ठाकरे, MC स्टॅन, शालिन भानोत, अर्चना गौतम आणि प्रियांका चौधरी चहर हे स्पर्धक आहेत. सोबतच घराबाहेर गेलेल्या स्पर्धकांची देखील जोरात चर्चा सुरु आहे. टीआरपीमध्ये बिग बॉस (Bigg Boss) अव्वल असल्याने बिग बॉसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना काही खास टास्कही दिले नाही. मात्र, तरीही घरातील सर्व सदस्य आपले स्थान पक्के करण्यासाठी काही ना काही तरी कार्य करत होते.

'बिग बॉस १६'च्या घरात एन्ट्री घेताच MC स्टॅन, साजिद खान, अब्दु रोजिक आणि शिव ठाकरे या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. सोबतच या चौघांची मेत्री देखील सर्वांनाच फार भावली. या मैत्रीच्या चौकटीतील दोघंजण अब्दु रोजिक आणि साजिद खान बिग बॉसच्या घराबाहेर आहे. तर, घरात शिव ठाकरे आणि MC स्टॅन हे दोन दमदार स्पर्धक आहेत.

MC स्टॅनचा चाहतावर्ग त्याच्या Hip-pop म्यूझिकमुळे बराच मोठा आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षा म्हणून बिग बॉसने एमसी स्टॅनला काही आठवड्यांसाठी नॉमिनेशनमध्ये टाकले होते. सतत नॉमिनेशनमध्ये राहूनही तो घराबाहेर गेला नाही. त्याला अनेकदा स्पर्धकांनी नॉमिनेट केल्याने त्याला घराबाहेर जायचे आहे, अशी मनातली खदखद व्यक्त केली होती.

इतकेच नाही तर एकदा स्वत: सलमान खानने MC स्टॅन घरात राहण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचे चाहते अनेक सेलिब्रिटी असल्याचे देखील आपण अनेकदा पाहिले आहे. त्याचा सर्वाधिक डायलॉग गाजला तो 'अस्सी हजार के शूज'वाला. त्याच्या डायलॉगने चाहत्यांच्या मनाततर घर निर्माण केलेच पण बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या देखील मनात घर करुन गेला.

MC स्टॅन हा मुळचा पुण्याचा. वयाच्या अवघ्या १२ वर्षांपासून कव्वाली गात आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. आता तो एक फेमस रॅपर असून त्याची फॅन फॉलोइंग देखील तगडी आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून MC स्टॅनने शून्यातून स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. एकेकाळी खिशात पैसे नसल्याने तो रस्त्यावर झोपायचा. MC स्टॅनचे पहिले गाणे 'समझ मेरी बात को' प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, खरी ओळख MC स्टॅनला 'वटा' या गाण्यामधून मिळाली. या गाण्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. MC स्टॅनचा चाहता वर्ग बघता स्टॅनही 'बिग बॉस १६' चा विजेता होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT