bigg boss season 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

Big Boss Season 16: हिंदी बिगबॉसचा पहिला खेळाडू प्रेक्षकांच्या समोर; चाहत्यांनी प्रश्न विचारुन केले हैरान

आता चाहत्यांच्यासमोर काही स्पर्धकांचे नावे आली आहेत. कलर्स वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे काही फोटोज् शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडमधील (Bollywood) बरेच कलाकार मंडळी आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात बिग बॉसने करतात. काहींना प्रसिद्धी मिळते तर काही सोशल मिडियावर ट्रोल होतात. आता पर्यंत हिंदी बॉलिवूडचे १५ सीझन येऊन गेले. आता प्रतिक्षा आहे आगामी १६व्या सीझनची. बिग बॉसचा (Big Boss) पहिला प्रोमो शेअर झाल्यापासून चाहत्यांना थिम कोणती असणार? कोणकोणते कलाकार सहभागी होणार? या गोष्टींची चाहत्यांना उत्सुकता होती. पण आता चाहत्यांच्यासमोर काही स्पर्धकांचे नावे आली आहेत. कलर्स वाहिनीच्या (Colors Tv) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media) त्यांचे काही फोटोज् शेअर केले आहेत.

जेव्हा त्याला विचारले की तुझा सर्वात आवडता स्पर्धक कोण आहे? त्याने 'बिग बॉस 13' फेम असीम रियाझ आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतले. तो बोलतो, "माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रामाणिक होते." बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, "बिग बॉस हे एक असे ठिकाण आहे जे तुम्हाला खरे दाखवते. मालिकांमध्ये जी भूमिका दिली आहे तेच साकारतात. त्यात त्यांचा वास्तववाद दाखवता येत नाही.

तसेच तो पुढे बोलतो, "बिग बॉस एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला तुमचा खरा स्वभाव दिसतो. आपण वास्तविक काय आहात? तुमचे व्यक्तिमत्व काय आहे? तुमचा विचार काय आहे? तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती सहन करु शकता? त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि मला पाहायचे आहे की सोशल मीडियाशिवाय चाहते मला किती आवडतात.

'बिग बॉस १६' येत्या १ ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान हा शो होस्ट करणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

SCROLL FOR NEXT