Sajid Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sajid Khan: साजिदच्या आयुष्यात वादाची वेगळी भूमिका, लहान वयातच गेला थेट तरुंगात !

बॉलिवूड दिग्दर्शक, होस्ट, कॉमेडियन आणि बिग बॉसच्या १६ व्या पर्वातील स्पर्धक साजिद खानचा आज वाढदिवस आहे. त्याचे बालपणही बरेच चर्चेत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sajid Khan: बॉलिवूड दिग्दर्शक आणि बिग बॉस १६ व्या पर्वातील स्पर्धक साजिद खानचा आज वाढदिवस आहे. दिग्दर्शक असण्यासोबतच होस्ट, कॉमेडियन आणि अभिनेता म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहे. साजिद खान सध्या बिग बॉसमध्ये १६व्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसत आहे. बिग बॉसच्या घरात साजिद खानच्या एन्ट्रीपासून बरेच वाद झाले होते.

आधीच सर्वाधिक वादात असलेल्या या कार्यक्रमाचा टीआरपी देखील चांगला आहे. जेव्हा बिग बॉसच्या घरात साजिद खानची एन्ट्री झाली तेव्हा बिग बॉसच्या घरात अजूनच वादाला तोंड फुटत गेले. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्या व्यवसायिक कारकिर्दीबद्दल जाणून घेणार आहे....

साजिदने मुंबईतच आपले शिक्षण पूर्ण केले असून त्याने आपल्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात १९६५मध्ये जासूसचा हॉस्ट म्हणून केली होती. नंतर त्याने इक्का पे इक्का मध्ये होस्टिंग केली. सोबतच त्याने 'कहने मैं क्या हर्ज है'या शोमध्ये तिहेरी भूमिका साकारली होती. हा शो १९९७ ते २००१ मध्ये प्रसारित झाला होता.

2008 मध्ये साजिद खानने साजिद सुपरस्टार्स हा टॉक शो होस्ट केला होता. तर साजिद दिग्दर्शक फराह खानचा भाऊ असून त्याने अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट दिग्दर्शनही केले आहे. साजिदच्या दिग्दर्शनात हे बेबी, डरना जरूरी है, हाऊसफुलचे सर्व सीरिज, हमशकल इत्यादींचा समावेश आहे.

त्याचबरोबर साजिद खानने बरेच टीव्ही शो सु्द्धा होस्ट आणि परिक्षणही केले आहेत. साजिदने 'नच बलिए 5 आणि 6' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट 2' देखील जज केले आहेत. साजिद खान 'झुठ बोले कौवा काटे, मैं हूं ना, मुझसे शादी करोगी आणि हॅपी न्यू् इयर' या चित्रपटात भूमिकेत दिसला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, साजिद खानचे बालपण गरिबीत गेले. जेव्हा तो 6 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आई-वडीलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. साजिद 14-15 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. साजिद खान बालपणी तुरुंगात गेला होता.

ंमीडिया रिपोर्टनुसार, साजिद खान एकदा चित्रपट पाहण्यासाठी जात होता आणि वाटेत पुलाच्या ऐवजी त्याने थेट मित्रासोबत रेल्वे ट्रॅक ओलांडला. अशा स्थितीत त्याला रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी त्याला पकडले, त्यावेळी त्याने एक रात्र तुरुंगात काढली होती.

साजिद काही काळापासून लैंगिक शोषणमुळे चर्चेत आहे. हाऊसफुल 4 चित्रपटादरम्यान, साजिदला #MeToo अंतर्गत अनेक गंभीर आरोपांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्याला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले, तसेच IFTDA (भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक) ने त्याच्यावर काही काळ बंदी घातली होती. अशा परिस्थितीत आता साजिदने बिग बॉसमधून टीव्हीवर पुनरागमन केले आहे. साजिद खानवर सिमरन सुरी, सलोनी चोप्रा रेचल आणि आहाना कुमरा यांच्यासह अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बंद बँक खात्यातून पैसे काढायचेत? RBI ने सांगितल्या ३ सोप्या स्टेप्स

Pinga Ga Pori Pinga Video : कुणीतरी येणार येणार गं! प्रेरणा होणार आई, 'पिंगा गर्ल्स'चा आनंद गगनात मावेना

न्याय मागणाऱ्या तरूणाला पोलिसांनी चोपलं; युवकाकडून विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

8AM Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर ब्लड शुगर का वाढलेली असते? 5 गोष्टी ठरतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT