abhijeet bichukale
abhijeet bichukale 
मनोरंजन बातम्या

अभिजीत बिचुकलेची धमाकेदार एन्ट्री; 'मैं किसी के बाप से...'

साम न्यूज नेटवर्क

सातारा : 'बिग बॉस 15' Big Boss 15 आजकाल वाइल्डकार्ड एंट्रीच्या माध्यमातून चर्चेत राहत आहे. देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई, राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांनी अलीकडेच शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. राखी सावंतच्या बीबी घरात प्रवेश करण्यापूर्वी सातारा येथील तसेच बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकलेला (abhijeet bichukale) घरात प्रवेश देण्यात आला हाेता. परंतु अभिजीतला कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्याने त्याची एंट्री थांबली हाेती. bigg boss 15 abhijeet bichukale enters house and verbal spat with umar riaz

आता अभिजीत पूर्णपणे निरोगी आहे. त्यामुळे त्याने बिग बाॅगसच्या घरात प्रवेश केला आहे. या शोमध्ये एंट्री केल्यानंतर अभिजीत म्हणताे मी खूप मृदू स्वभावाचा आहे परंतु जेव्हा मी माझ्या विशिष्ट पातळीवर येतो तेव्हा मी लाव्हा बनताे. त्याच वेळी रश्मी देसाई अभिजीतला प्रश्न विचारते काय करताेस मग तेव्हा अभिजीत म्हणतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.

घरात प्रवेश करताच अभिजीत उमर रियाजशी umar riaz भांडतात. अभिजीतला थेट व्हीआयपी म्हणून आणले आहे. त्यामुळे त्यालाही थोडी मनमानी करायची आहे. त्याने उमर रियाजला त्याच्या बेडवरुन दूर व्हायला सांगताे कारण त्याला आता ताेच बेड हवा असताे. रियाझ या गाेष्टीला नकार देताे. अभिजितला तोच बेड हवा यावर ठाम राहाे. राखी सावंत उमरला म्हणते ते व्हीआयपी आहेत आणि तुम्हाला हे मान्य करावे लागेल. त्यावर उमर रागावताे आणि काहीही बडबडताे. अभिजीतची एन्ट्री आणि त्यांच्यातील भांडणाची प्रोमोची झलक सर्वत्र व्हायरल हाेत आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT