Rubina Dilaik Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

'तुला अनफॉलो करण्याची वेळ आलीये', आई झाल्यानंतर Rubina Dilaik चा मोनोकिनी लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Rubina Dilaik Trolled: रुबीना दिलैक सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच रुबीनाने तिचे नवीन फोटोशूट शेअर केले. या फोटोंमुळे रुबीनाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

Priya More

Bigg Boss 14 Winner Rubina Dilaik:

टीव्हीवरील संस्कारी बहू आणि 'बिग बॉस 14' ची (Bigg Boss 14) विनर रुबीना दिलैक (Rubina Dilaik) सध्या चर्चेत आली आहे. रुबीना दिलैकने तीन महिन्यांपूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे आणि आई झाल्यामुळे रुबीना दिलैक खूपच आनंदी आहे. सध्या ती आपल्या मुलींसोबत कॉलिटी टाइम स्पेंड करत आहे. असे असताना देखील रुबीना दिलैक सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच रुबीनाने तिचे नवीन फोटोशूट शेअर केले. या फोटोंमुळे रुबीनाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

रुबिना दिलैक गेल्या काही महिन्यांपासून अभिनयाच्या जगापासून दूर आहे. प्रेग्नेंसीनंतर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती दररोज चर्चेत राहते. नुकताच रुबिनाने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना चकित केले. मात्र, यामुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. आई झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये रुबीनाने चांगलेच ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. तिचा वेटलॉस पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. पण अशामध्ये तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

रुबिना दिलैकने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुबीना ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. रुबिनाने मोनोकिनीसोबत ट्रान्सफरंट श्रग घेतला आहे. अभिनेत्रीने मोनोकिनीसोबत टॉप बन आणि ब्लॅक कलरच्या गॉगलसह पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये ती जबरदस्त दिसत आहे. एका फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या बाहेर तर कधी स्विमिंग पूलमध्ये आपली फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

रुबीनाचे हे फोटो तिचा पती अभिनव शुक्लाने क्लिक केले आहेत. हे फोटो शेअर करताना रुबिनाने तिच्या पतीसाठी सुंदर कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुझा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला खूप आवडतो.' या फोटोशूटमुळे रुबीना दिलैकला ट्रोल केले आहे. एका युजरने कमेंट्स करत लिहिले की, 'बकवास परिधान करून मर्यादा ओलांडली.' दुसऱ्याने लिहिले की, 'मॅडम, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे आवश्यक होते का?' चौथ्या युजरने लिहिले की, 'तुला अनफॉलो करण्याची वेळ आली आहे.' तर आणखी काही युजर्सनी, 'मी तुझा चाहता आहे पण मला हे आवडत नाही', 'आता तू मनातून उतरली', 'मला लाज वाटत आहे.', 'तुला स्वाभिमान आहे की नाही, 'उर्फीपेक्षा कमी नाहीस.', अशा कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

SCROLL FOR NEXT