Rubina Dilaik Twin Daughter Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik: रुबिना दिलैकने १ महिन्यानंतर दाखवला जुळ्या मुलींचा चेहरा, खूपच सुंदर ठेवली नावं

Rubina Dilaik Twin Daughter Photos: रुबीना आणि अभिनवने आपल्या एका-एका मुलीला घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रुबीनाच्या मुलींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Rubina Dilaik Reveals Daughter Name :

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 ) फेम रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि तिचा पती अभिनव शुल्क (Abhinav Shukla) घरी नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खूपच आनंदी आहेत. काही दिवसांपूर्वी रुबीनाने दोन गोंडस मुलींना जन्म दिला होता. आता एका महिन्यानंतर रुबीनाने आपल्या जुळ्या मुलींची झलख दाखवली आहे. रुबीना आणि अभिनवने आपल्या एका-एका मुलीला घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रुबीनाच्या मुलींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बिग बॉस फेम रुबीना दिलैकने मुलींच्या जन्मानंतर एका महिन्यानंतर त्यांचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. यासोबतच तिने आपल्या मुलींची नावं देखील सांगितली आहेत. रुबीनाने आपल्या मुलींची नावं खूपच सुंदर ठेवली आहेत. रुबिनाने मुलींचे फोटो आणि घरामध्ये पूजा केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनवने आपल्या हातात एका मुलीला तर रुबीनाने आपल्या हातात दुसऱ्या मुलीला घेतलं आहे.

रुबीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने स्काय ब्लू कलरचा सलवार सूट घातला आहे. तर अभिनव शुक्लाने व्हाइट कलरचा कुर्ता-पायजमा घातला आहे. रुबिनाने आपल्या मुलींची नावं जीवा आणि इधा अशी ठेवली आहेत. फोटो शेअर रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या मुली जीवा आणि इधा आज एका महिन्याच्या झाल्या आहेत हे सांगताना खूप आनंद होत आहे.'

रुबीनाने आपल्या मुलीचे नाव जीवा ठेवले आहे याचा अर्थ जीवन, अमर असा होतो. हे नाव सूर्यदेवाच्या १०८ नावांपैकी एक आहे. रुबीनाने दुसऱ्या मुलीचे नाव इधा ठेवले आहे. त्याचा अर्थ होतो पवित्र, धन, शक्ती आणि खुशी. रुबीनाने २७ नोव्हेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला होता. तिने तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले होते की, 'गुरूपर्वच्या शुभ दिनी ब्रम्हांडने आम्हाला आशीर्वाद दिला, आमच्यासाठी तुम्ही आशीर्वाद पाठवले.' रुनीनाच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि सेलिब्रटांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

आता बुधवारी म्हणजे २७ डिसेंबरला तिच्या मुली एका महिन्याच्या झाल्या. तिने आपल्या मुलींच्या पहिल्या महिन्याचा वाढदिवस साजरा केला. मुलींना एक महिना पूर्ण झाल्यानंतर रुबीनाने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. त्यांच्यासोबत तिने फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान, रुबिना आणि भिनवने २०२८ मध्ये लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

SCROLL FOR NEXT