Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss : बिग बॉसनंतर खरंच आयुष्य बदलते? घराबाहेर पडताच स्पर्धकांने केला मोठा खुलासा

Bigg Boss Contestants : आता बिग बॉसची सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकाने बिग बॉस शो केल्यानंतर आयुष्यावर काय परिणाम होतो यावर मोठा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस 18' ची चर्चा पाहायला मिळत आहे. एका आठवड्यातच बिग बॉसच्या सदस्यांनी घरात धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धक घरात 100 दिवस राहतात आणि आपला गेम खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

एका मिडिया मुलाखतीत बोलताना करणवीर ने बिग बॉस विषयी सांगितले आहे. त्याला मुलाखतीत "बॉसचा करिअरवर परिणाम होतो का?" असे विचारल्यावर तो म्हणाला की, "नाही" करणवीर बोहरा बिग बॉस 12 मध्ये पाहायला मिळाला होता. त्याने अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, "बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा मला आनंद आहे. कारण यातून मला पैसे मिळण्यासोबत नवीन काहीतरी शिकायला ही मिळते. त्यामुळे मला याचा पश्चाताप नाही."

बिग बॉसच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीसाच्या रक्कमेसोबतच खूप प्रसिद्धी देखील मिळते. बिग बॉसहा असा प्लॅटफॉम आहे ज्यात तु्म्ही अवघ्या 100 दिवस प्रसिद्ध होऊ शकता. असं म्हटलं जातं. मात्र अनेकांना हा प्रश्न असतो की, बिग बॉसचा आपल्या करिअरवर काही परिणाम पडतो का, तसेच बिग बॉसनंतर करिअर कोणते वळण घेते. या संदर्भातच बिग बॉस फेम करणवीर बोहरा यांनी आपले मत मांडले आहे.

करणवीर बोहराला बिग बॉसने दर आठवड्याला २० लाख रुपये मानधन दिलं आहे. करणवीर या शोचा फायनलिस्ट होता. आता 'बिग बॉस 18' मध्ये पुढे काय होणार पहिला आठवडा गाजवणारे गुणरत्न सदावर्ते यांचा पुढे कोणता राडा पाहायला मिळणार आणि तसेच घरातून पहिलं कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत हे लहान पक्ष सुद्धा ठरू शकतात 'गेम चेंजर'; कसे ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT