Prasad Jawade- Amruta Deshmukh Wedding: Saamtv
मनोरंजन बातम्या

Prasad Jawade- Amruta Deshmukh: 'बिग बॉस' फेम जोडीचं जमलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; लग्नाची तारीखही ठरली

Prasad Jawade- Amruta Deshmukh Engagement: अमृता आणि प्रसाद जवादेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही सांगितली आहे.

Gangappa Pujari

Amruta Deshmukh Prasad Jawade Viral Post: बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून सिझनमध्ये सर्वात चर्चा झालेली जोडी म्हणजेच अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे नाव घेतले जाते. ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये मैत्री झाली.

दोघांच्या प्रेम प्रकरणाचीही बरीच चर्चा रंगली होती. अखेर आता या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून अमृता आणि प्रसाद जवादेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही सांगितली आहे. याबाबतची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे. (Amruta Deshmukh Instagram Post)

बिग बॉसमधून आले होते चर्चेत...

बिग बॉस फेम अमृता देशमुख (Amruta Deshmukh) कायम चर्चेत असते. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर तिने रेडिओ जॉकी म्हणून प्रवास सुरू केला. रेडिओवरील ‘टॉकरवडी’ या तिच्या शोला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. बिग बॉसमध्ये असताना अमृताचे प्रसाद जवादेसोबत (Prasad Jawade) नाव जोडले गेले.

अमृता- प्रसादने उरकला साखरपूडा...

त्यांच्या या नात्यावर शिक्कामोर्तब झाले असून अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसादने साखरपुडा (Engagement) उरकल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अमृताने नुकतीच याबाबतची इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या दोघांनीही साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी अमृता आणि प्रसादच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे.

लग्नाची तारीखही ठरली!

"आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत”, असा हटके कॅप्शन अमृता देशमुखने दिला आहे. तसेच तिने येत्या १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचेही जाहीर केले आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अल्पवयीन मुलांमध्ये जुन्या वादातून जबर मारहाण

Sindhudurg : मार्च- एप्रिलची 'सुरंगी' चक्क जूनमध्ये बहरली | VIDEO

Bhivpuri tourism: कर्जतपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे 'ही' जागा; One Day पिकनीकसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Ind Vs Pak : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान सामना होणार? पण कुठे आणि कधी?

Walmik Karad: जातीवाचक शिवीगाळ, 10 लाखांची फसवणूक अन्...; आरोपी वाल्मिक कराडची आणखी ऑडिओ क्लिप समोर|VIDEO

SCROLL FOR NEXT