Salman Khan Death Threat Answer Twitter
मनोरंजन बातम्या

Salman Khan Threat Case Update : सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट, 16 वर्षांच्या 'रॉकी भाई'ने केला होता भाईजानला फोन...

Actor Salman Khan : 16 वर्षांच्या रॉकी भाईला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने शहापूरातून ताब्यात घेतले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान (Salman Khan) खानला पुन्हा एकदा जीवे मारण्यीची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सलमान खानला धमकीचा (Salman Khan Threat Case) फोन करणाऱ्याचा शोध घेतला आहे.

16 वर्षांच्या रॉकी भाईला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. सध्या या रॉकी भाईची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने ही धमकी का दिली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला होता. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सर्व यंत्रणा हालवत अधिक तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान सलमान खानला धमकी देणारी व्यक्ती दुसरी दिसरी कोणी नसून 16 वर्षांचा मुलगा असल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधून या मुलाला ताब्यात घेतले.

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या मुलाची चौकशी सुरु आहे. तो मुळचा राजस्थान येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाने धमकीचा कॉल का केला होता याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोमवारी रात्री या मुलाने रॉकी भाईच्या नावाने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 'मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगून ठेवा' अशी धमकी त्याने फोन करुन दिली होती. यावेळी त्याने स्वत:ची ओळख रॉकी भाई गोशाळा रक्षक, जोधपूर- राजस्थान अशी सांगितली होती.

दरम्यान, सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. कधी पत्र तर कधी फोनद्वारे त्याला धमक्या येत आहे. याआधी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून त्याला जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यासोबतच सलमानने स्वरक्षणासाठी खास बुलेटप्रुफ गाडी परदेशातून मागवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT