Sushant Singh Case update Saam tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Case : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; रिया चक्रवर्तीला क्निलचीट, वाचा सविस्तर

Sushant Singh Case update : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने रिया चक्रवर्तीला क्निलचीट मिळाली आहे .

Vishal Gangurde

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची मोठी अपडेट आली आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या प्रकरणात कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयने तपास बंद केला आहे. यामुळे रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला आहे. रियाला क्लिनचीट मिळाली आहे.

सुशांतसिंह राजपूतने आमहत्या केल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. अनेकांकडून सुशांतसिंह राजपूतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने तपास सुरु केला होता. मात्र, तब्बल चार वर्षांनंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. यात सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचेच सिद्ध झाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सीबीआयने मुंबईच्या एका विशेष कोर्टात सीबीआय क्लोजर सादर केला. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट पाहून तपासाचे पुढील आदेश दिले जाणार आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहार पोलिसांनी तपास हातात घेतला होता. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे त्याला प्रवृत्त केल्याने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली.

एम्सच्या फोरेन्सिक पथकाने विष देऊन आणि गळा दाबून हत्या केल्याचे दावे फेटाळले. या प्रकरणात सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि त्याच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवण्यात आले होते. सुशांतसिंह राजपूतचे मेडिकल रिपोर्ट देखील एकत्र केले होते.

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी आरोप केला होता की, रिया चक्रवर्तीने तिच्या कुटुंबीयाच्या साथीने पैशांसाठी सुशांतचा छळ केला. मात्र, सुशांतच्या वडिलांचे आरोप रिया चक्रवर्तीने फेटाळले होते. या प्रकरणी रियासहित अनेक कलाकारांशी चौकशी झाली होती. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रियाला महिनाभर तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे पोहोचल्यानंतर त्यांनी आत्महत्या आणि हत्या दोन्ही बाजूने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

SCROLL FOR NEXT