CBI raids: बिटकॉइन स्कॅम! १० टक्क्यांचं दाखवलं आमिष, देशभरात पसरवलं जाळं, ६६०० कोटींचा घोटाळा उघड, CBIची छापेमारी

Shilpa Shetty Raj Kundra Bitcoin case: राज्यात बिटकॉइनचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल ६६०० कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती सीबीआयच्या छापेमारीत उघडकीस आली आहे.
Scam
ScamSaam Tv News
Published On

राज्यात बिटकॉइनचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल ६६०० कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, नांदेड, कोल्हापूरसह, दिल्ली आणि बंगळुरू अशा ६० शहरांमध्ये सीबीआयनं देशभरात छापेमारी केली. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली असून, या कारवाईत महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागल्याचा दावा विभागाच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

मे. व्हेरिएबल टेक प्रा.लि. या कंपनीची स्थापना अमित भारद्वाज याने केली होती. कंपनीच्या गेन बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवले. २०१७ मध्ये या कंपनीचं जाळं पसरत गेलं. हजारो गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली.

Scam
Home loan: गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी ७ टिप्स, लाखोंची बचत होईल

मात्र, काही काळानंतर गुंतवणूदारांना परतावा देणं थांबविले. नंतर फसवणूक झाल्याचं समजताच अमितविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात एकट्या नांदेडमध्ये बिटकॉइनच्या माध्यमातून ५०० कोटी रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नंतर अमितने फसवणूक करून दुबईत पळ काढला. दरम्यान, कंपनीच्या संचलकांनी देशभरातून जमा झालेले ६६०६ कोटी रूपये हे विविध मार्गाने आपल्या खात्यांमध्ये वळवले.

Scam
ladki Bahin Yojana: 'देवा भाऊं'च्या सरकारविरोधात ५० लाख बहिणी एकत्र मैदानात उतरणार, शरद पवार गटातील नेत्याचं मोठं विधान

शिल्पा -राजवर कारवाई

मागील वर्षी १८ एप्रिल रोजी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती. ईडीनं कारवाई करत २७ कोटी ७९ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली होती. बिटकॉइनमधून कमावलेल्या पैशांतून कुंद्रा याने ही मालमत्ता खरेदी केल्याचा दावा ईडीनं केलाय. त्यातून ही जप्तीची कारवाई झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com