Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: 'गुलिगत' सूरजची बिग बॉसच्या घरात झाली फजिती, सोशल मीडियावर Video Viral

Guligat Suraj Chavan Viral Video: गोलिगत उर्फ सुरज चव्हाण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या सुरजचा एक व्हिडिओ सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य त्याची फजिती करताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठी सीझन ५च्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली असून या आठवड्यात घरामध्ये एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. हा सदस्य सहा वेळा 'मिस्टर इंडिया', तर पाच वेळा 'महाराष्ट्र श्री'चा मानकरी ठरला होता.या सदस्याचे नाव संग्राम चौगुले असून याची बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. संग्रामच्या एन्ट्रीपूर्वी घरातील सदस्यांमध्ये नेमकं कुणाची एन्ट्री होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

सूरजचा चव्हान उर्फ गुलिगतचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये घरातील सर्व सदस्य सूरजची खिल्ली उडवताना दिसत आहेत.व्हायरल व्हिडिओमध्ये सूरज वैभवला म्हणतो की,"वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून कोणी तर मुलगी आली पाहिजे." त्यावर वैभव अंकिताला म्हणतो की, " बघ सुरज म्हणाला की वाईल्ड कार्ड एन्ट्री एखाद्या मुलीची झाली तर बरं होईल ना."

यामुळे सर्व सदस्य खळखळून हसतात. त्यानंतर अंकिता सुरजला म्हणते की," बाबा तु चुकीचा गेम समजतोय. तु जरा थंड घे." त्यानंतर पॅडी दादाला हाक मारत सुरजच्या ''याला समजवा हा चुकीचा गेम खेळू लागलाय.'' असं म्हणते. त्यानंतर अंकिता सूरजची अॅक्टिंग करते आणि त्याने बोलले वाक्य परत बोलते, "कोणी तर पोरगी आली पाहिजेल" असं बोलते. त्यावर पॅडी सूरजला विचारतो "जर कोणी मुलगी आली तर तु पटवशील का?" त्यावर सूरज लाजत लाजत म्हणतो की, "हो चालेल", असं बोलताच पॅडी आणि सुरजमध्ये पैज लागते. त्यावर डीपी दादा सूरजला सपोर्ट करतात म्हणतो की "तुला मुलगी पटवायला आणि तुझं प्रेम प्रकरण सुरू होण्यासाठी मी तुला मदत करीन." यानंतर सर्व सदस्य खळखळून हसतात.

सूरजच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळाली आहे. मागील काही आठवड्यांपासून सूरज टास्क दरम्यान आक्रमक भूमिकेत दिसतो.यंदाच्या बिग बॉस मराठीच्या प्रत्येक भागामध्ये नविन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.दुसरीकडे प्रेक्षकांना वाईल्ड कार्ड एन्ट्री नेमकं कोणाची होणार याची उत्सुकता लागली होती.मात्र संग्रामच्या येण्यामुळे आता घरामध्ये पुन्हा नवे राडे पाहायला मिळणार का? आणि घरातील सदस्य संग्रामसोबत नेमकं कसे टास्क खेळणार हे पाहाणं रंजक ठरणार आहे.

Edited By : Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

SCROLL FOR NEXT