big boss marathi season 5 canva
मनोरंजन बातम्या

Big boss Marathi 5: 'वैभव त्याच्या बॉडीमुळे दिसतोय', निक्कीच्या वाक्यामुळे बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा

Big boss Marathi New Promo: बिग बॉस मराठीच्या नव्या आठवड्याला दमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये निक्की वैभव आणि अरबाजमध्ये राडा पाहायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसापासूनचं घरातील सदस्यांमध्ये राडे पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यामध्ये सर्व सदस्यांची तारेवरची कसरत पाहायला मिळाली होती. बिग मराठीच्या ५व्या पर्वाचे सुत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करताना दिसतोय. रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने सर्व सदस्यांना ताकीद दिली होती.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात चांगलीच दणक्यात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये टास्क दरम्यान घरातल्या सदस्यांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये एकुन दोन टीम आहेत. नव्या प्रोमोमध्ये टीम मध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, निक्की आणि अरबाज वैभव विषयी बोलताना दिसत आहेत. निक्की अरबाजला म्हणते की," वैभवला तुझ्या आणि माझ्यापासून जेलीसी आहे. एका गोष्टीवरून नाही तर अनेक गोष्टीवरून त्याला आपल्यासोबत जेलेसी आहे. तुझा राग, गेम जास्त उभरून दिसतो. विकेंडच्या वार पण तूझ्याबद्दल बोलले जाते. तुझी निगेटिव्ह का होईना पण भाऊच्या धक्यावर बोलले जाते. त्यांना जेलिसी आहेत की त्याच्या बद्दल बोलले जात नाही. वैभव या शोमध्ये फक्त त्याच्या बॉडीमुळे दिसत आहे."

'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल. निक्कीच्या अश्या बोलण्याने वैभव कसा रिॲक्ट करेल. हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच वर्षा उसगावकर कॅप्टन म्हणून या वादावर काय भूमिका घेणार हे पाहाण रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT