Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi : "दम असेल तर मला बाहेर काढून दाखव"; जान्हवीचं निक्कीला चॅलेंज

Big Boss Marathi 5 New Promo: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसी टास्क पार पडतोय. टास्क दरम्यान जन्हवी आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे. या भांडमुळे त्यांच्यामधील मैत्रीला अनखी तडा जाणार का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'ची सध्या तुफान चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात कधी कोणता ड्रामा होईल याचा काही अंदाज लावता येत नाही. या घरातील सदस्यांची नात्याची समीकरणं ही नेहमी बदलताना दिसतात.

निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरची घट्ट मैत्री सुरुवातीचे काही दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पण नंतर त्यांच्या मैत्रीत फूट पडली. आता त्यांच्यात जोरदार वादावादी झालेली पाहायला मिळणार आहे.

कॅप्टनसीवरुन निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भडका उडाला आहे. दोघी एकमेकांना चॅलेंज देताना आजच्या भागात दिसतील. समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणतेय,"दम असेल तर मला बाहेर काढून दाखव..चॅलेंज आहे". त्यावर निक्की म्हणते,"कॅप्टनसीमधून तिला काढलं याचा राग आलाय तिला". जान्हवी पुढे म्हणते,"या घरात सगळ्यांना तू घाण झाली आहेस".

अरबाज आणि वैभव करतायत जान्हवीबद्दल चर्चा

वैभवला अरबाज म्हणतोय,"आता तू माझं दुसरं रूप बघशील. जान्हवीने माझ्यावर आरडाओरडी केली. टास्कदरम्यान तिने मला खूप इरिटेड केलं आहे. मला खूप काही बोलली. जान्हवी आपल्यासाठी खेळतेय हे माझ्या मनात आलं नाही". वैभव पुढे अरबाजला सांगतो जान्हवीने माझ्यासाठी खेळण्याला होकार दिला होता. अरबाज पुढे म्हणतो,"वैभवला उडवायचं असं ती सगळ्यांना म्हणाली होती".

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT